भारतीय पत्रकार संघ पुणे जिल्हाध्यक्ष पदी तैनुर शेख, सचिवपदी काशिनाथ पिंगळे यांची नियुक्ती
बारामती, (वार्ताहर) : असोसिएशन ऑफ इंडियन जर्नलिस्ट भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी बारामतीचे तैनुर शफिर शेख यांची तर सचिवपदी काशिनाथ पिंगळे यांची एकमताने निवड करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश संघटक अनिल सोनवणे व पुणे विभागीय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष एस. बी. नदाफ यांनी नियुक्तीचे पत्र देवून निवड केली. संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन यांच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष एम. एस. शेख यांच्या अनुमतीने तसेच महाराष्ट्र प्रदेश संघटक अनिल सोनवणे यांच्या आदेशाने व प्रदेश अध्यक्ष लिगल विंगचे अँड. कैलास पठारे यांच्या शिफारशीने शेख व पिंगळे यांची निवड करण्यात आली. येणाऱ्या काळात जिल्ह्यातील पत्रकारांना संघटीत करून त्यांच्या प्रश्नासाठी वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निवडी प्रसंगी दोघांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा