अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांचा मोहोळ मध्ये जंगी स्वागत सत्कार
*मोहोळ दि. ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष मंत्रीस्तर महेश ढवळे यांचा श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक मोहोळ येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत मोहोळ तालुक्याच्या वतीने जंगी स्वागत सत्कार करण्यात आला.*
राज्याचे अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे हे तीन दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर विविध शासकीय कामाचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत मोहोळ तालुक्याच्या वतीने त्यांच्या सत्काराचे नियोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य राजन घाडगे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत प्र.तालुकाध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी, सिनेअभिनेते अमोल महामुनी, बिलालभाई शेख, श्री. बावधनकर, संजय आठवले, महेश सोवनी, देविदास चेंडगे, मंगेश पांढरे आदि. प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांचा शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. मोहोळ शहरातील व तालुक्यातील ए.पी.एल. प्रवर्गातील शिधापत्रिकाधारक यांचा इस्टांक वाढवून त्यांना एन.पी.एच. मधून पी.एच. मध्ये समाविष्ट करण्यात यावे व मोहोळ शहराची वाढती लोकसंख्याचा विचार करता शहरांमध्ये दोन ते तीन स्वस्त धान्य दुकानाची नव्याने निर्मिती करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायत मोहोळ तालुक्याच्या वतीने देण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा