सर्व्हिस इंजिनीयर फोरम बारमाती तर्फे अभियंता दिन (इंजिनीअर्स डे) साजरा
डावी कडून- इंजि.दिलीप भिसे, हेमचंद्र शिंदे, महेश रोकडे, छगन लोणकर, गोरख सावंत बबनराव संग्रामपुरकर आणि इतर
बारामती (महाराज्य टाईम्स) • मागील वीस वर्ष कार्यरत असणाऱ्या व पाटबंधारे खात्यातील अभियंत्यांनी स्थापन केलेल्या "सर्व्हिस इंजिनिअर्स फोरम, बारामती" तर्फे भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचा जन्मदिन 15 सप्टेंबर 2023 रोजी "अभियंता दिन" म्हणून जेष्ठ नागरिक संघ कार्यालय बारामती येथे इंजि. उद्धव मोरे यांचे अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. बारामती फलटण इंदापूर परिसरातील 60 अभियंते उपस्थित होते. इंजिनीअर्स डे निमित्ताने मागील वर्षभरातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभियंत्यांना गौरविण्यात आले.
• याप्रसंगी इंजिनीयर बबनराव संग्रामपूरकर दिलीप भिसे यांनी वयाचा "अमृत महोत्सव" साजरा केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
• इंजि. महेश रोकडे मुख्य अधिकारी बारामती नगरपालिका यांचा नगरपालिकेस स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत देशांमधून व माझी वसुंधरा अंतर्गत राज्यांतून द्वितीय क्रमांक मिळविणे कामी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले
• इंजि. हेमचंद्र शिंदे यांनी "प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक" म्हणून शैक्षणिक क्षेत्रातील पंचवीस वर्षाच्या यशस्वी योगदानाबद्दल "करिअर महागुरू" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
• "विषमुक्त शेती" संशोधन आणि प्रचार करून बारामतीकरांना विषमुक्त फळे व भाजीपाला उपलब्ध करून देत असल्याबद्दल इंजि. गोरख सावंत यांना सन्मानित करण्यात आले.
• 13 जून 2023 रोजी नीरा डावा कालव्यात वाहून जाणाऱ्या युवकाचा जीव वाचवले बद्दल इंजि. छगन लोणकर यांना "जीवन रक्षक" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
• कुमारी मधुरा रवींद्र पाटकर हिस आय आय एस इ आर (IISER)भोपाळ येथून स्तनाचे कर्करोगावर संशोधन करून पीएचडी प्राप्त केल्याबद्दल गौरवण्यात आले.
• याप्रसंगी महेश रोकडे यांनी नगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण तसेच इतर अभियानात आजपर्यंत फोरमचे सहकार्य मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून भविष्यातही अभियंत्यांनी वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
• अभियंता असूनही प्रदीप वाळुंजकर यांनी "ध्यान आणि साधना" या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. इंजि. दीपक पांढरे यांनी "देशाची- राज्याची उपयुक्त जलसंपदा व भविष्यातील वाटचाल" या विषयावर व्याख्यान दिले
• फोरमचे अध्यक्ष अजित जमदाडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन केले तसेच प्रदीप कुलकर्णी यांनी आभार मानले.
विश्वेश्वरय्या यांचा जन्म 15 सप्टेंबर 1960 रोजी झाला सदरचा दिवस हा अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा