बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी संभाजी होळकरांची चवथ्यांदा फेरनिवड, शहराध्यपदी पुन्हा जय पाटील
मेळाव्यात कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष खा. सुनिलजी तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष सौ. रुपालीताई चाकणकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
बारामती तालुक्यात तळागाळापर्यंत पोहचुन एक एक कार्यकर्ते जोडण्याचे काम करून तब्बल १२ वर्षे राष्ट्रवादी पक्षाला बळकटी आणून देणार्या संभाजी होळकर यांना चौथ्यांदा तालुकाध्यक्षपदी फेर निवड करण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष केल्याचे दिसून आले. तसेच बारामती शहरात पक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी सोडवण्याविषयी उत्तम काम शहर अध्यक्ष म्हणून जय पाटील यांनी आज पर्यंत केल्यामुळे त्यांची सुद्धा फेर निवड शहराध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे. बारामती शहरात अजूनही काही नव्याने काही चेहर्यांना संधी देण्यात आल्याचे दिसून आहे. त्यात प्रताप आबा पागळे, राॅबर्ट जाधव व इतर नावे लवकरच जाहिर करण्यात येणार आहेत.
नियुक्ती पत्र खा. सुनिल तटकरे, सौ. रुपालीताई चाकणकर, प्रदिपदादा गारटकर पुणे जिल्हाध्यक्ष, सुरज चव्हाण प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवक यांच्या हस्ते देण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा