धनगर आरक्षण आंदोलनाला जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांची उपोषण मागे घेण्यासाठी भेट, उपोषणकर्ते मागणीवर ठाम. उद्या दू. 12 पर्यंत बारामती बंद राहणार

उद्या बारामती बंद दुपारी १२ वाजेपर्यंत राहणार असून व्यापारी महासंघ व आंदोलनकर्ते यांचे आवाहन

बारामती:- (महाराज्य टाईम्स) बारामतीत गेली सात दिवसापासून धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या चंद्रकांत वाघमोडे यांना पाठिंबा देण्यासाठी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होत असून गावातून रॅली काढून पाठिंबा देण्यात आला प्रशासन भवन, बारामती समोर चालू असलेल्या उपोषणाला धनगर आरक्षणासाठी प्रशासकीय भवन बारामती येथे सुरु असलेल्या आमरण उपोषणाला महिलांचा भाऊबीज करुन पाठिंबा देण्यात आला, उपोषण कर्त्याची दखल तात्काळ न घेतल्यास उद्या दि. 16/11/2023 ला बारामती बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता यावेळी पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख व पोलीस अधीक्षक अंकित गोयल पुणे ग्रामीण यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांच्याशी चर्चा करून आम्ही शासनाच्या वतीने आलो आहोत आपण उपोषण सोडावे अशी विनंती करण्यात आली.

    यावेळी बऱ्याच वेळ समजाविण्याचा प्रयत्न केला परंतु उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे हे आपल्या भूमिकेवर ठाम होते, त्यांनी हात जोडून जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना विनंती केली की मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, जो पर्यंत मुख्यमंत्री धनगर आरक्षणावर निर्णय घेत नाही व त्यांनी अथवा त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा होत नाही तोपर्यंत चालू असलेले आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

" बारामती व्यापारी महासंघाच्या वतीने संध्याकाळी धनगर आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रत्यक्ष जाऊन भेट घेण्यात आली. पदाधिकाऱ्यांकडून उद्या बारामती बंद च्या मागणीला समर्थन देण्यात आले. पण सध्या दिवाळी सणाचा उद्या शेवटचा दिवस असल्याने व्यापारी मंडळींनी दुपारी १२ वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे सर्व दुकानदार व ग्राहकांनी दुपारी १२ वाजेपर्यंत दुकाने बंद राहतील याची नोंद घ्यावी असे आवाहन व्यापारी महासंघाचे पदाधिकारी नरेंद्र गुजराथी यांनी केले आहे. आंदोलनाला भेट देण्यासाठी जगदीश पंजाबी, संभाजी किर्वे, नरेंद्र गुजराथी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. "

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक