डिजिटल मार्केटिंग व जाहिरात हा प्रत्येक व्यवसायाचा मेंदू तोच आजकाल व्यवसायाला गती देऊ शकतो - किरण पवार

प्रतिनिधी -(महाराज्य टाईम्स) बारामती बिजनेस चौक या माध्यमातून बारामती मधील व्यवसायिकांसाठी एक व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे. बारामती परिसरातील छोट्या मोठ्या व्यवसायिकांपासून सर्वच क्षेत्रातील लोकांचा यामध्ये समावेश आहे. 
    "बीबीसी" च्या माध्यमातून वेगवेगळी चर्चासत्रे आयोजित केली जातात. या नविन संकल्पनेने अनेक अनोळखी जुने नवे व्यावसायिक एकमेकांशी जोडले गेले आहेत. काही जण १०-२० वर्षापासून व्यवसाय करत आहेत तर काही जण नुकतेच व्यवसायात पडले आहेत. जरी एखादा व्यवसायिक अनेक वर्षापासून व्यवसाय करत असेल तरी आजकालच्या स्पर्धेच्या युगात एखादी ट्रिक व्यवसायाला गती देऊ शकते.
     यासाठी आजच्या संवाद दोन या सत्रात व्यवसाय वाढीसाठी जाहिरात व डिजिटल मार्केटिंग याविषयी फ्युजन ग्रुपचे संचालक किरण पवार यांनी आज उपस्थित व्यवसायिकांना मार्गदर्शन केले.  हा कार्यक्रम अमित देशपांडे यांच्या सेवन हेवन केक शॉप येथे सुभद्रा मॉल सिटी इन चौक येथे संपन्न झाला. 

      प्रत्येक व्यवसाइकाने डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून करावयाच्या गोष्टी त्यातून व्यवसाय वाढीसाठी मिळणारा मार्ग याविषयी उपस्थित व्यवसायिकांनी उपयुक्त माहिती जाणून घेतली व यावर चर्चा केली बारामती व परिसरातून 41 व्यवसायिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक