मंत्री महोदय येता दारा....चकाचक रस्ता रात्रीत होतो भरा भरा ?? -- जनतेच्या पैशाचा पुरेपुर वापर ? ?
बारामती: (महाराज्य टाईम्स) बारामती शहरात रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. प्रचंड खड्डे चुकवत दुचाकी चालकांचे खुप हाल होत आहेत. पण प्रशासन मात्र डोळेझाक करताना दिसतयं का असा प्रश्न आहे. मात्र मंत्री महोदय शहरात येणार म्हटले की एका रात्रीत रस्ता करण्यात येतो असे दिसून आले आहे.
काही दिवसांपूर्वी शहरातील प्रतिष्ठित जेष्ठ व्यापारी व एका संस्थेचे अध्यक्ष यांचे निधन झाले त्यांच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट देण्यासाठी तांदुळवाडीवेस चौक येथे राज्याचे उपमुख्यमंत्रि व बारामतीचे विकास पुरुष मा. अजितदादा पवार येणार होते.
आदल्याच दिवशी रात्रीत शासकिय यंत्रणा युद्ध पातळीवर कामाला लागली. जुनी मंडई गुनवडी चौक ते तांदूळवाडीवेस चौक असा रस्ता अगोदर चांगलाच होता म्हणजे खड्डेखुड्डे असा काही वाईट अवस्था नव्हती. खरी वाईट अवस्था होती ती तांदूळवाडी वेस चौकाच्या पुढे श्री हनुमान मंदिर जवळ विलास खैरे यांच्या गॅरेजच्या दारात प्रचंड मोठा खड्डा अनेक महिन्यांपासून होता. अनेक दुचाकी चालक या खड्ड्यात पडल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले आहे. पावसाळ्यात तर पाण्याचे डबकं तयार होऊन गॅरेजमध्ये पाणी शिरले होते अनेक वेळा तेव्हा प्रशासनाने कधीच येवढी तत्परता दाखवली नाही.
मात्र उपमुख्यमंत्र्यांचा ताफा ज्या रस्तावरून जाणार त्या रस्यावर रेडिमिक्स डांबराचा एक थर मारण्यात आला. रस्ता डांबरिकरणाची कुठलीच शास्त्रोक्त प्रकिया राबवण्यात आली नाही. फक्त रस्ता झाडुन मागोमाग लगेच डांबराच्या गाडीने थर टाकण्यात आला स्थानिक नागरिकांनी महाराज्य टाईम्सशी बोलताना सांगितले. म्हणजे प्रशासनाने मालक असलेल्या जनतेने कष्टाने जमविलेल्या पैशाने शासनाचा कर भरला त्याचा वापर असा केला का? असा सवाल नागरिकांना पडला आहे.
जर राजकीय मंत्री ज्या भागात जाणार त्या भागात जर रस्ते चांगले होणार असतील तर त्या मंत्र्यानी जरा आमराई, खंडोबानगर, जामदार रोड, सटवाजीनगर, अशा व अनेक शहरातील रस्त्याने जावे म्हणजे आमच्या भागातील रस्ते नीट होतील. खड्डे तरी बुजवले जातील. अनेक अपघात खड्डे असल्यामुळे झाले आहेत. असंख्य नागरिकांना मणक्याच्या विकारांचा त्रास सुरु झाला आहे.
एसी आँफिस मधून खाली आले की, जनतेच्या पैशाच्या सरकारी गाडीत बसून जाणार्या मुख्याधिकार्यांना अगर मंत्र्याना खड्ड्यात अचानक दणका बसल्यावर काय होत? हे कस कळणार?
(भिगवण चौक,येथे अनेक महिन्यांपासून पडलेले खड्डे- बुजवण्यासाठी मंत्र्यांची गाडी येथून जाण्याची वाट बघत आहेत)
स्वतःची बायको अचानक समोर आलेल्या खड्ड्यात गाडी गेल्यावर खाली पडल्यावर काय चिड येते ही त्यांना कशी कळणार? बारामती शहरात अत्यंत दुर्दैवी घटना घडल्या आहेत अचानक स्पिड ब्रेकर वरुन गाडी उडाल्यावर मागील व्यक्ती खाली पडून जखमी झाल्या आहेत. कारण काय बेफिकीर प्रशासन ज्यांनी स्पिड ब्रेकरवर साधे पांढरे पट्टे न मारल्यामुळे.
म्हणजे जनतेच्या(मालकाच्या) पैशावर लाखो रुपये गलेलठ्ठ पगार खाऊन मालकाचे हाल करणार्यांना थोडीतरी जनाची नाहि तर मनाची वाटली पाहिजे. दुर्गा टाॅकिजजवळ कदम चौकाजवळ अत्यंत भयानक स्पिड ब्रेकर आहेत हे ज्वलंत उदाहरण आहे. तसेच कारभारी सातव शाळा रिंग रोड, कसबा येथे सुद्धा अंधार असतो व अनेक स्पिड ब्रेकर आहेत पांढरे पट्टे नसलेले त्यामुळे अनेक जण पडून जखमी झाले आहेत.
स्थानिक नगरसेवकांची मुदत संपली असल्यामुळे व अजून नगरपालिका निवडणूक जाहिर झाली नसल्यामुळे कोणीही मालक जनतेकडे बघण्यास तयार नाही. त्यामुळे सध्या जनता राम भरोसे आहे. किंवा मंत्री महोदय आपल्या भागात केव्हा येतील याची वाट बघत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा