महाराष्ट्र सरकार : खाते वाटप गृह खाते हे देवेंद्र फडणवीस, अर्थ अजित पवार, गृहनिर्माण एकनाथ शिंदे

मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप कधी होणार, अशी चर्चा सुरू होती. अशात सरकारच्या वतीने आज रात्री खातेवाटप करण्यात आले असून गृह खाते हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच कायम राहिले आहे. तर अर्थ खाते हे अजित पवारांकडे देण्यात आले आहे. गृहखात्यासाठी अडून बसलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते देण्यात आले आहे.

जाणून घ्या, कोणाला कोणते मंत्रिपद मिळाले...

चंद्रशेखर बावनकुळे - महसूल

राधाकृष्ण विखे पाटील जलसंधारण (गोदावरी व कृष्णा खोरे विकास)

हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण

चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

गिरीश महाजन - जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा

गणेश वाहन - पर्यटन

दादाजी भुसे - शालेय शिक्षण

संजय राठोड - माती व पाणी परीक्षण

धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा

जयकुमार रावल - मार्केटिंग प्रोटोकॉल

पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर

अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय

शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान

दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय

अदिती तटकरे - महिला व बालविकास

शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम

माणिकराव कोकाटे - कृषी

जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज

राज्यमंत्री

माधुरी मिसाळ - सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण

आशिष जयस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय

मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी
योगेश कदम - ग्रामविकास, पंचायत राज

पंकज भोयर - गृहनिर्माण

15 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 23 व्या दिवशी रविवारी नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. फडणवीस सरकारमध्ये 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांसह ही संख्या 42 झाली आहे. मंत्रिमंडळात एकूण 43 मंत्री शपथ घेऊ शकतात. तर, एक जागा रिक्त ठेवण्यात आली आहे.

फडणवीस सरकारमध्ये भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातील 9 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांना त्यात स्थान मिळाले नाही. यामध्ये भाजपचे 4, शिवसेनेचे 3, राष्ट्रवादीचे 5 मंत्री आहेत. तर, 19 नवीन आमदार मंत्री झाले. यामध्ये भाजपचे 9, शिवसेनेचे 8 आणि राष्ट्रवादीचे 4 उमेदवार आहेत.

याशिवाय 4 महिला (3 भाजप, 1 राष्ट्रवादी) आणि 1 मुस्लीम (राष्ट्रवादी) यांना सरकारमध्ये स्थान मिळाले आहे. सर्वात तरुण मंत्री राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे (36) आहेत, तर सर्वात वयस्कर मंत्री भाजपचे गणेश नाईक (74) आहेत.

टिप्पण्या

  1. ज्या दिवशी evm बंद होऊन ब्यालेट पेपर वरती मतदान होईल त्या दिवशी भाजपचा सुपडा साफ होईल आणि शिंदे यांचे तीन आमदारही निवडून येणार नाहीत

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक