श्री गणेश जन्मोत्सव सोहळा निमित्त दाते श्री गणपती मंदिरात आज पासुन धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

बारामती : (महाराज्य टाईम्स्) माघ महिन्यात श्री गणेश जन्म संपुर्ण भारतात श्री गणेश मंदिरांमध्ये खुप भक्तीभावाने साजरा केला जातो. त्याप्रमाणेच बारामती शहरात अत्यंत पुरातन असे श्री दाते यांचे जागृत श्री सिद्धीविनायक श्री गणपती मंदिर आहे. अनेक वर्षांपासून येथे गणेश जन्मोत्सवाचे आयोजन केले जाते.
   आज माघ शुद्ध प्रतिपदा. माघ मासाची सुरुवात आणि गणेश जन्माची चाहूल. वास्तविक पाहता गणपतीच्या अनेक अवतारांपैकी आपण *श्रीमहोत्कट विनायक* अवताराचा जन्म माघात साजरा करतो. माघ मासाच्या शुद्ध चतुर्थी तिथीस 'श्री महोत्कट विनायक' नावाने  आदिती आणि कश्यप ऋषींच्या आश्रमी माध्यान्ही अवतार घेतला. मत्सरासुर पुत्र देवांतक आणि नरांतक या असूर बंधूंच्या वधासाठी आणि भक्तकल्याणासाठी हा अवतार झाला. 
    गाणपत्य सांप्रदायात प्रतिपदेपासून जन्मोत्सव सुरु होतो. प्रतिपदेपासून मंत्रोच्चारणपूर्वक अभिषेक आणि विविध सहस्त्रार्चने, पोशाख, महानैवेद्य अशा नानाप्रकारे मोरयाची सेवा चालते. चतुर्थीस माध्यान्ही जन्मकाळ होऊन पंचमीस जन्मोत्सवाची सांगता होते.
      सालाबाद प्रमाणे यंदाही श्री गणपती देवस्थान ट्रस्ट श्रीसिध्दिविनायक मंदिर बारामती, यांचे वतीने माघ शु. चतुर्थी गुरुवार दि.२२/०१/२०२६ रोजी दुपारी १२ वा. १५ मि. श्रीगणेश जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. श्रीगणेश जन्मोत्सव सोहळ्याचा प्रारंभ माघ शु. प्रतिपदा सोमवार दि.१९/०१/२०२६ रोजी होत असून माघ शु. पंचमी शुक्रवार दि.२३/०१/२०२६ रोजी उत्सव सांगता होत आहे. या कालावधीमध्ये विविध पारंपारिक कार्यक्रमांचे सुंदर आयोजन करण्यात आले आहे.
   
      माघ शु. प्रतिपदा सोमवार दि. १९/०१/२०२६ माघ श्रीगणेश जन्मोत्सव सोहळा प्रारंभ, सकाळी ७ वा. श्रीं स महाभिषेक, महावस्त्रालंकार पुजा, सायंकाळी ५ ते ७ स्तोत्र पठण सर्वांसाठी खुले, सायंकाळी ७ वा. आरती व स्तोत्र पठण.
     माघ शु. द्वितीया मंगळवार दि.२०/०१/२०२६ स. ७ वा. श्रीं स महाभिषेक, महावस्त्रालंकार पुजा, सायंकाळी ७ वा. श्रींची आरती, सायं. ७.१५ वा. भक्तीगीतांचा कार्यक्रम सादरकर्ते- सानिका कुलकर्णी पुणे
     माघ शु. तृतिया बुधवार दि.२१/०१/२०२६ अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तना करीता ब्रम्हवृंदास वर्णी स. ७.३० ते स. ९.३०, श्रीं स महाभिषेक, महावस्त्रालंकार पुजा, सायंकाळी ७ वा. श्रींची आरती व स्तोत्र पठण, सायं. ७.१५ वा. भक्ती संध्या सादरकर्ते- कीवेव म्युझिक अँकॅडमी बारामती सर्व विद्यार्थी

     माघ शु. चतुर्थी (मुख्य दिवस) गुरुवार दि.२२/०१/२०२६ श्रीं स महाभिषेक, महावस्त्रालंकार पुजा, स.९ ते ११.३० पर्यंत देवजन्माचे किर्तन श्री वासुदेव जोशी, दु. १२.१५ वा. श्रींचा जन्मोत्सव व पाळणा नंतर महाआरती. संध्याकाळी ४ ते ७ भव्यदिव्य अशी श्रींची ग्राम प्रदक्षिणा पालखी रथोत्सव मिरवणूक निघणार आहे. सायं. ७.३० वा. महाआरती व प्रसाद.
श्री गणपती मंदिरात होणार असुन खिरापतीचा प्रसाद वाटप होणार आहे. 
    माघ शु.पंचमी शुक्रवार दि.२३/०१/२०२६ स. ७ वा. श्रीं महाभिषेक, महावस्त्रालंकार पुजा, सकाळी ९ ते १२ उत्सव सांगता किर्तन सादर - ज्ञानदा बुरसे-पंडित, पुणे १२ वा. श्रींची महाआरती व त्यानंतर पंचमी महाप्रसादाचा पवित्र लाभ भक्तांसाठी मिळणार आहे.

    
श्री दाते यांच्या गणपती मंदिरातील श्री गणेशोत्सव सोहळा व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ श्री गणेश भक्तांनी अवश्य घ्यावा अशी भावना श्री राजेश दाते काका व सौ. जयश्री दाते वहिनी यांनी महाराज्य टाईम्सशी बोलताना व्यक्त केली.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक