ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात सोमवारी मासिक शिवरात्र कीर्तन महोत्सव व महाप्रसादाचे आयोजन
महाराज्य टाईम्स: दि.२२
बारामतीचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर येथे दर महिन्याला येणार्या शिवरात्रीला कीर्तन व महाप्रसादाचे सोमवार दि. २३ जुन रोजी करण्यात आले आहे.
ज्याप्रमाणे वर्षातुन एकदा महाशिवरात्री असते त्यावेळेस जगभरात सर्व शिवमंदिरात महाउत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. तसेच दर महिन्याला सुद्धा तिथीनुसार शिवरात्र येत असते. प्रत्येक महिन्याला येणार्या शिवरात्रीला शिवभक्त मनोभावे शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात काही जण उपवास करतात व आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात.
ह्या जुन महिन्यात सोमवार दि. २३ रोजी १७ वी मासिक सेवा केली जाणार आहे. शिवरात्रीच्या दिवशी श्री सिद्धेश्वर मंदिर, सिद्धेश्वर गल्ली येथे शिवरात्र किर्तन महोत्सव समितीच्या वतीने संध्याकाळी ५ ते ७ वां. हरिपाठ चे आयोजन केले असुन भक्तिनाद भजनी मंडळ, कल्यानीनगर,बारामती ह्यांच्यावतीने सेवा केली जाणार आहे. तसेच संध्या. ७ ते ९ वाजेपर्यंत सातारा येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार गुरुवर्य ह.भ.प. श्रीपाद महाराज जाधव हे कीर्तन सेवा करणार आहेत. किर्तनसेवा नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
ह्या महिन्यातील सेवा सलग १७ महिन्यांपासून म्हणजे मागील सव्वा वर्षांपासून अविरत व अखंडपणे मोठ्या उत्सहाने समितीच्या वतीने चालू आहे. तरी शिवभक्तांनी शिवरात्र कीर्तन व महाप्रसादाचा पवित्र लाभ घ्यावा अशी विनंती श्री सिद्धेश्वर कीर्तन महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा