गणेशोत्सवाला आता राज्य महोत्सवाचा दर्जा: सार्वजनिक मंडळांना 7 दिवस सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत ध्वनिक्षेपकाला परवानगी

महाराज्य टाईम्स:  राज्य शासनाने गणेश उत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळाला ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवादरम्यान ७ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी निर्गमित केला आहे.
   ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराच्या निर्बंधास सूट दिल्याबाबत यापूर्वीच्या ३१ जानेवारी २०२५ रोजीच्या आदेशात बदल करून हे सुधारित आदेश जारी करण्यात आले आहेत. यानुसार गणेशोत्सवासाठी शनिवार ३० ऑगस्ट, रविवार ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर, २ सप्टेंबर, ३ सप्टेंबर, ४ सप्टेंबर, ६ सप्टेंबर या एकूण ७ दिवसांच्या कालावधीत सदर निर्बंधांना सूट देण्यात आली आहे.
     नवरात्री उत्सवासाठी बुधवार १ ऑक्टोबर व गुरुवार २ ऑक्टोबर, ख्रिसमससाठी गुरुवार २५ डिसेंबर आणि वर्षाअखेरसाठी बुधवार ३१ डिसेंबर रोजीही या निर्बंधांना सूट देण्यात आली आहे. तसेच महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार परवानगी देण्याच्या अनुषंगाने एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे.
      ध्वनी प्रदुषण नियम २००० मधील नियम ३ व ४ व ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम २०१७ च्या नियम ५ उपनियम (३) चे पालन करण्यात यावे, झोनिंग प्रमाणे ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज ठेवू नये. ही सूट शांतता क्षेत्रात लागू नसेल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक