स्वातंत्र्याच्या क्रांतीविरांना मानवंदना देण्यासाठी उद्या क्रांतीदिन साजरा करण्याचे आयोजन

महाराज्य टाईम्स(८ आँगस्ट): क्रांती दिनाच्या आठवणी उजळ करण्यासाठी शनिवार ९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता हुतात्मा स्तंभ वंदे मातरम चौक, (भिगवण चौक) या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन
     ब्रिटिशांची दीडशे (१५०) वर्ष जुलमी राजवट आपल्या देशावर होती. या पारतंत्र्याच्या जोखंड्यातून जनतेला मुक्त करण्यासाठी सण अठराशे सत्तावन (१८५७) पासून वासुदेव बळवंत फडके या आद्य क्रांतिकारकापासून अनेक वीरांनी प्राणाची आहुती दिली आहे. १९४२ पर्यंत स्वातंत्र्य आंदोलनाची धार जनतेच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये निर्माण झाली होती. अनेक क्रांतिकारकांनी शसस्त्र उठाव केला. नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली.प्रत्येक जण आपापल्या विचाराप्रमाणे व शक्तीप्रमाणे कार्यरत राहिले.
        दिनांक ८ ऑगस्ट १९४२ हा दिवस एक आगळा आणि वेगळ्या घटनांनी जागतिक इतिहासात अजरामर झाला.त्यादिवशी मुंबई येथील गोवा लिया टॅंक या मैदानावर अखिल भारतीय काँग्रेसची बैठक झाली.आणि त्या बैठकीमध्ये अहिंसक आणि सत्याग्रही मार्गाने चळवळीचा विडा उचललेल्या पूज्य महात्मा गांधींनी *"चलेजाव" (QUIT INDIA)* हा निर्वारीचा इशारा ब्रिटिशांना दयावा लागला आणि त्याकरिता भारतीय जनतेला *"करा किंवा मरा" (DO OR DIE)* हा संदेश त्यांनी दिला.त्यावेळी व्यासपीठावर पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री,सरदार वल्लभभाई पटेल,इत्यादी फार मोठे व्यक्तिमत्व उपस्थित होते.या संदेशाने भारतातील प्रत्येक नागरिक बालकापासून ते वृद्धांपर्यंत महिला आणि पुरुष यांच्यात प्रत्यक्षपणे नेतृत्वाची निर्मिती झाली. कारण या चळवळीला मुळापासून स्वातंत्र्याची ज्योत स्वातंत्र्याच्या ज्योतीचा मोठ्या आगीमध्ये समावेश झाला. ही कल्पना ब्रिटिश सत्तेला सहन न झाल्याने ९ ऑगस्ट १९४२ रोजी पूज्य महात्मा गांधीजी आणि सर्व नेत्यांना अटक करून संपूर्ण देशात धरपकडीचे तंत्र अवलंबिले आणि लाखो जणांना बंधीवास बनविले. म्हणून या स्वातंत्र्याच्या क्रांतीचा उदय मुंबईच्या गोवालिया टॅंक वर मिळाल्यानंतर या 
गोवालिया टॅकचे ऑगस्ट क्रांती मैदान असे नामकरण करण्यात आले. याची आठवण म्हणून भारत सरकार प्रतिवर्षी ९ ऑगस्ट रोजी देशातील ठराविक स्वातंत्र्य सैनिकांना दिल्ली येथे बोलावून राष्ट्रपतीच्या हस्ते सन्मान करण्याची तसेच महाराष्ट्र सरकार या ९ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती मैदानावर राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांना सन्मानित करून क्रांती स्तंभाला अभिवादन करतात.
      सन १९४२ साली मुंबई येथील ( गोवालिया टॅंक) ऑगस्ट क्रांती मैदान येथे भारत देश ब्रिटिशांच्या हुकूमशाहीमधून मुक्त करण्याकरिता पूज्य महात्मा गांधी यांनी चलेजाव,भारत छोडोचा नारा दिला तो दिवस म्हणजे ९ ऑगस्ट रोजी संपूर्ण भारत देशात क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो.
     पूज्य महात्मा गांधी यांनी भारत देशास सुराज्य मिळवून दिले परंतु स्वराज्याचे कसे निर्माण होईल या त्यांच्या संकल्पना होत्या व त्यांचे स्वराज्याचे स्वप्न अजूनही अपूर्ण राहिलेले आहे. ते पुरे करण्याकरिता नवीन पिढीला सुसंस्कृत तयार करण्याकरिता आत्ता हा क्रांती दिन साजरा करणे गरजेचे झाले आहे व आपले भारतीय नागरिक म्हणून क्रांती दिन हा दिवस साजरा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे व ते आपले आद्य कर्तव्य आहे.
         क्रांती दिन हा दरवर्षी संपूर्ण भारत देशात भारत सरकार तर्फे साजरा केला जातो तसेच बारामती येथे सुद्धा बारामती तालुका स्वातंत्र्यसैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटना क्रांती दिन साजरा करत असतात.
          तरी बारामतीतील सर्व नागरिकांनी युवा विद्यार्थी-विद्यार्थिनी, व्यापारी,डॉक्टर, वकील,सर्व संस्थेचे पदाधिकारी, सर्व शाळा, महाविद्यालय, मुख्याध्यापक,शिक्षक, पदाधिकारी सर्व संस्थेचे पदाधिकारी, सरकारी निमसरकारी अधिकारी, बारामती नगर परिषदेचे सर्व माजी नगरसेवक, कर्मचारी,सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते,यांनी क्रांती दिन साजरा करण्याकरिता बारामती येथील हुतात्मा स्तंभ वंदे मातरम चौक (भिगवन चौक) येथे वार शनिवार दिनांक ९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ठीक ११ वाजता न विसरता राष्ट्रीय पोशाखात १५ मिनिटे अगोदर उपस्थित राहावे. अशी विनंती निलेशभई कोठारी, तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना, बारामती यांच्या वतीने करण्यात आली आहे.
*स्थळ:-* हुतात्मा स्तंभ,वंदे मातरम चौक (भिगवन चौक) बारामती.
*वेळ:-* सकाळी ११ वाजता.
*वार:-* शनिवार *दिनांक:-* ९ ऑगस्ट २०२५.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक