नाव मोठ्ठ लक्षण खोठ्ठं !! एसटी स्टँडवर रक्षाबंधनलाच लाडक्या बहिणींचे हाल?

बारामती: (दि.१० महाराज्य टाईम्स)
      बारामतीत विमानतळासारख्या दिसणार्या एसटी स्टँडवर गाड्याच्या निकृष्ठ नियोजनामुळे ऐन रक्षाबंधन दिवसालाच लाडक्या बहिणीला होतोय प्रचंड त्रास
     शनिवार रविवार व रक्षाबंधन सलग असल्यामुळे बारामतीत बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती. बाहेरगावाहून अनेक परिवार आले आहेत. आपल्या भावाला राखी बांधायला तर काही भाऊ बहिणींकडे जात आहेत. त्यामुळे बारामती एसटी स्टँडवर सणासुदीमुळे प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आली. विमानतळासारखे दिसणारे बसस्थानक असे नावाजले गेले पण प्रत्यक्षात जैसे थे परिस्थिती बघायला मिळत आहे. असुविधांच्या बाबतीत अनेक पत्रकारांनी लेखणीच्या व बातमीच्या माध्यमातून आवाज उठवला पण ढिम्म प्रशासन कानाडोळा करत असताना दिसतोय का? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
     आज रविवार असल्यामुळे महिलांची प्रचंड गर्दी स्टँडवर होती. आणि जास्त करुन दौंड व इंदापुरला जाणार्या गाड्यांच्या फलाटावर अति प्रमाणात महिलां गाड्यांची वाट बघत ताटकळत केविलवाण्या चेहर्यानि उभ्या असलेल्या दिसल्या. बर्याच लाडक्या बहिणींनी महाराज्य टाईम्स प्रतिनिधीशी बोलताना अत्यंत संतप्त भावना व्यक्त केल्या "नुसते नाव मोठ्ठ अनं लक्षण खोठ्ठं आम्हाला तासनं तास प्रचंड गर्मीत उभं राहिला लागतयं. तिकडं डेपो मॅनेजर एसी केबिनमध्ये बसणार आणि आमचे हाल बघणार" 
    वास्तविक बघितले तर गाड्याचे नियोजन नाही. चौकशी केबिनमध्ये विचारले तर सांगितले जाते गाडी लागेल तेव्हा कळेल गाड्या कमी आहेत. अशी उर्मट भाषा प्रवाशांना वापरली जाते. चौकशी कर्मचारी येणारा जाणार्या गाड्यांची नोंद वहीला लिहण्यामध्ये व्यस्त असतो तो वर बघत पण नाही. दोन तीन वेळा विचारले तरच रागाने उत्तर मिळते.
"प्रवाशांच्या सेवेसाठी" ब्रीद वाक्य असलेले प्रशासन प्रवाशांची गैरसोय करून त्रास देताना दिसत आहेत. चौकशी केबिनमध्ये चौकशीचा फोन रिसिव्हर काढून ठेवलेला नेहमीच असतो. त्यामुळे प्रवाशांना घरुन माहिती घेता नाही त्यामुळे थेट स्टँडवर आल्यावरच कळते कि गाडी आत्ताच निघून गेली त्यामुळे तो एक असुविधेचा मनस्ताप.
लँडलाईन फोनचा रिसिव्हर बाजूला काढून ठेवला आहे. त्यामुळे फोन व्यस्त किंवा लागतच नाही.

प्रवासी वाहतूक नियंत्रक पद असणारा कर्मचारी जागेवर हजर नसतो. प्रवाशांची चेंगराचेंगरी

गाड्यांचे निकृष्ट नियोजन त्यामुळे प्रवाशांचे हाल व गर्दीमुळे चोरांचा फायदा !

इंदापुरला जाणार्या गाड्या ह्या इंदापुर डेपोच्या आहेत. तिकडुन पाठवल्यावर त्या येतील. इंदापूर डेपो मॅनेजरला सांगून लवकर गाड्या पाठवायला सांगतो. गरज लागली तर आपली गाडीची व्यवस्था करतो. ---वाहतूक निरिक्षक घनश्याम शिंदे 

     करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या विमानतळासारख्या स्टँडवर प्रवाशांना घामाघुम होऊन बसावे लागते कडक उन्हात व गर्मीत हवा मिळण्यासाठी एक सुद्धा पंखा नाही हे एक दुर्दैवच म्हणावे लागेल का? प्रवाशांना पिण्याचे पाणी विकत घेऊन प्यावे लागते पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्थाच नाही. महाराज्य टाईम्समध्ये उन्हाळ्यामध्ये प्रवाशांचे पाण्यावाचून हाल बातमी प्रसिद्ध झाल्यावर प्रशासनाने दोन फिल्टर बसवले ते पण ५-६ दिवसात बंद पडले. स्टँडवरच्या दुकानातुन पाणी बाॅटलची विक्री वाढावी म्हणून तर पाण्याची व्यवस्था नाही अशी शंका प्रवाशांना येत आहे.
बंद अवस्थेत पडून पाण्याचा फिल्टर 
   
विकासाचा डंका दिवसरात्र वाजवणार्यांना ह्या गैरसोयी दिसत नाहीत का? शनिवार रविवार नेते विकासकामाची पाहणी करतात त्यावेळेस मागेपुढे पळणार्यांनी सदर गैरसोयी त्यांच्या कानावर का घालत नाही हा प्रश्न त्रासलेल्या प्रवाशांना पडला आहे?






   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक