स्वातंत्र्य सैनिकांच्या उपोषणाला खा.शरद पवारसाहेब व युगेंद्र पवार यांचा जाहिर पाठिंबा
बारामती दि.१४ (महाराज्य टाईम्स) शहरातील भिगवण चौक येथील हुतात्मा स्तंभ इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सदर हुतात्मा स्तंभ अन्य ठिकाणी हलवू नये, या मागणीसाठी राज्यातील स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे उत्तराधीकारी निषेध व्यक्त करण्यासाठी नगर परिषदच्या प्रवेशद्वारावर लाक्षणिक उपोषण करत आहेत.
सदर उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) चे नेते युगेंद्रदादा पवार हे उपस्थित राहिले होते. त्यांनी भाषणामध्ये हुत्मात्मा स्तंभ अडगळीच्या जागी हलवण्याच्या निर्णयाला कडाडून ठामपणे विरोध केला. आदरणीय शरद पवार साहेब ब मी स्वातंत्र्य सैनिकांच्या भुमिकेसोबत असुन उपोषणाला १००% पाठिंबा देत आहोत असे सांगितले. युगेंद्र पवार पुढे म्हणाले विकास काय सगळेच करतात आम्ही करतो तुम्ही करता पण हुतात्म्यांचा अवमान करुन विकास करत असाल तर आमचा ठाम विरोध आहे. पवार साहेबांना विद्यार्थी दशेत व राजकिय जिवनात तालुक्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे कायम त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत हे जाहीरपणे मी सांगतो.
बारामती तालुका स्वातंत्र्यसैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष निलेश कोठारी व अँड.अशोक इंगुले यांनी यासंदर्भातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना निवेदन दिलेले आहे.
उपोषणावेळी निलेश कोठारी व अँड. इंगुले म्हणाले की,
बारामती शहरातील वंदे मातरम चौक (भिगवण चौक) येथील बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना, बारामती मार्फत स्वातंत्र्य सैनिकांच्या खर्चातुन सार्वजनिक खात्यासह बारामती नगरपरिषदेची परवानगी घेऊन हा हुतात्मा स्तंभ उभारलेला आहे. या स्तंभासमोर १ मे महाराष्ट्र राज्य स्थापन दिवस, ९ ऑगस्ट क्रांती दिन, १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिवस, २ ऑक्टेबर - महात्मा गांधी जयंती, इत्यादी दिवशी हुतात्म्यांचे स्मरण व पुजन इत्यादी कार्यक्रम केले जातात. बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटनेने कायदेशीररित्या उभारलेला हुतात्मा स्तंभ बेकायदेशीररित्या त्या जागेवरून हलवुन अडगळीच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याची व इरिगेशन खात्याची परवानगी न काढता तसेच बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटनेस कसलेही तोंडी लेखी सुचना न देता हा हुतात्मा स्तंभ हलवण्याचा घाट विकासाच्या नावाखाली चालू आहे हे अतिशय दुर्दैवी व हुतात्म्यांचा व स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान केल्यासारखे आहे.
आमच्या पत्राची यथायोग्य दखल न घेता हुतात्मा स्तंभ स्थलांतर केल्यास त्याच जागेवर हुतात्मा स्तंभाची पुर्नस्थापना होईपर्यंत संघटनेमार्फत महाराष्ट्रातुन जास्तीत जास्त स्वातंत्र्य सैनिक बारामतीमध्ये येवुन प्राणांतिक आमरण उपोषणास बसणार आहेत, याच्या होणा-या नुकसानीची जबाबदारी प्रशासनावर राहील याची दखल घ्यावी, असा इशारा कोठारी यांनी दिला.
सदर उपोषणस्थळी विरोधी पक्ष नेते मा.नगरसेवक सुनिल सस्ते, शिवसेना पुणे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे, सामाजिक कार्यकर्ते अँड.शामराव पोटरे व मनसे बारामती अध्यक्ष, काँग्रेसचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहून उपोषण आंदोलनाला जाहिर पाठिंबा दिला व हुतात्म्यांचा अवमान करणार्यांचा धिक्कार केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा