सणासुदीला होतोय प्रवाशांची अडवणूक? करोडोच्या स्टँडच्या खर्चामुळे होतेय आर्थिक पिळवणूक?
महाराज्य टाईम्स:(26 आँगस्ट) सणासुदीच्या व उत्सवाच्या दिवसात बारामती बसस्थानकात प्रवाशांच्या गडबडीच्या वेळेला शिवशाही बस लाऊन जादा भाडे वसूल करण्यासाठी आर्थिक पिळवणूक करुन दुसरा पर्याय नसल्याने अडवणूक केली जात असल्याचे दिसून येत आहे.
ऐन सणासुदीच्या दिवसात नागरिकांना आपल्या घरी जाण्यासाठी किंवा कामावर हजर होण्यासाठी प्रवास करावा लागतो. अशा वेळेस सकाळी सकाळी लवकर पोहचण्याची प्रत्येकालाच घाई व गडबड असते. बसस्थानकात पोहचले की, सकाळी गर्दी व रांग असतेच पण एकावेळेस तीन चार शिवशाही बसेस फलाटाला लागलेल्या असतात. जर प्रवासला साध्या बसने जायचे असेल तर तो दुसर्या साध्या बससाठी वाट बघतो. पण साध्या बसची वाट बघायची वेळ येऊच नये व शिवशाही बसेस लागोपाठ सोडल्या जातात. अशा वेळेस प्रवाशांना कुठलाच पर्याय उरत नाही. मग आर्थिक भुर्दंड व मनस्ताप करुन तिकिट घ्यावेच लागते. जिथं साध्या बसचे पुण्याचे तिकिट भाडे १७७ रु. आहे तर शिवशाहीचे २६० रू म्हणजेच जवळपास १०० रु चा नाहक भुर्दड प्रवाशांना सोसावा लागतो. का तर म्हणतात मा "वाट पाहिन पण एसटीनेच जाईन" मग बसतो पैशाचा फाईन.
आज सकाळी अनेक प्रवाशांनी महाराज्प टाईम्सच्या प्रतिनिधीकडे प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली. बारामतीच्या नेत्यांनी विकासात्मक धोरण घेऊन बसस्थानक सुशोभीकरण व आधुनिक सुधारना करण्यासाठी जवळपास ८० कोटी खर्च केला असेल मग त्याची वसुली आमच्याकडून केली जातीये का? असा संतप्त सवाल प्रवाशांनी विचारला आहे.
तिकिट बुकिंग करणार्या कर्मचार्याला विचारले असता त्यांनी सांगितले गणपती सणामुळे शिवशाही बस सोडल्या आहेत. तिन बस लागोपाठ सोडणार आहेत. म्हणजेच "प्रवाशांच्या सेवेसाठी" ब्रिदवाक्य असलेले महामंडळ "प्रवाशांच्या गैरसोयीसाठी" ठरत आहे का?
पुण्याला जाणार्या प्रवाशांसारखा अनुभव कोल्हापूर, छ.संभाजीनगर व नाशिक जाणार्या प्रवाशांना पण येत आहे. स्थानकप्रमुख किंवा आगारप्रमुखांना प्रवाशांनी विचारपूस केल्यास त्यांना सांगितले जाते वरूनच आम्हाला आदेश आहे शिवशाही बसेस लावण्याचा त्यामुळे आम्हाला लावाव्याच लागतात.
स्थानक प्रमुख व आगार प्रमुख त्याच्या लाखो रुपये खर्च करुन बांधलेल्या कार्यालयात बसलेले कधीच कुठल्या प्रवाशांना दिसले नाहीत. कारण कार्यालय कायम कुलुप लाऊन बंदच असते.
बारामती ते कोल्हापुर जाणाऱ्या शिवशाही बसच्या एका कंडक्टरने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले कि, डिझेल १६००० रू. भरले आहे. पण तिकिट विक्रीतून फक्त ६००० रू. गोळा झाले. तब्बल ९००० रु. नुकसान आपल्या महामंडळाचे होतय आम्हाला पण दिसतयं वाईट पण वाटतयं पण वरुन आदेशच आहे शिवशाहीच लावा तर काय करणार प्रवाशी सुद्धा जवळपास दिडपट तिकिटभाडे असल्यामुळे गाडीत बसत नाही. मग गाडी मोकळीच न्यावी लागते.
( फक्त एकच प्रवाशी असलेली मोकळी शिवशाही बस )
विकास करण्यासाठी करोडो रूपयांचा खर्च केला त्याची वसुली अशा पद्धतीने नागरिकांकडुन केली जाते का? असा सवाल नागरिक संतप्तपणे विचारत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा