आर्थिक फसवणुक करणार्या आरोपीस ६ महिने तुरुंगवास, तीन लाख रूपये दंड- बारामती न्यायालयाचा आदेश ! अँड.विशाल बर्गे यांच्या ६ वर्षाच्या प्रयत्नांना यश
महाराज्य टाईम्स: येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मा. दुर्गा प्र.पुजारी साहेब यांनी आरोपी राहुल श्रीकांत हरिहर रा. गुणवडी बारामती याला तारीख 22/9/205 रोजी तुरुंगवास, ३ लाख रुपये दंड ठोठावला आणि दंडाच्या रकमेतून फिर्यादी याना चेक ची रक्कम 2,95,000 नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला.
फिर्यादी अभिजीत बाबासाहेब थोरात हे बारामती येथील प्रसिद्ध ॐकार एंटरप्राईजेस मोबाईल अँन्ड गिफ्ट शाॅपी याचे मालक आहेत. आरोपी व फिर्यादी हे जुने मित्र होते. आरोपी हा बीटमाईन मार्ट मार्केटिंग कंपनी तर्फे बारामती भागातील मॅनेजर म्हणुन काम पाहत होते. सन 2019 काळात आरोपीने फिर्यादी कडून वेळोवेळी पावणेतीन लाख रुपये पैसे घेतले होते. व त्यांचा वेळेत परतावा दिला जाईल. अशी हमी दिली होती. परंतु आरोपीने अगर त्यांच्या कंपनीने वेळेत पैशाची परतफेड आरोपी केले नाही. म्हणून आरोपीने त्या रकमेचा चेक फिर्यादी याना दिला. फिर्यादीने तो चेक स्वतः च्या बँक खात्यावर भरला असता तो न वटता परत आला. त्यामुळे फिर्यादी यांनी *अँड विशाल विजयकुमार बर्गे* यांच्या मार्फत फौजदारी खटला बारामती कोर्टात दाखल केला होता.
आरोपीने असा बचाव घेतला होता की, फिर्यादी याला सदर कंपनीने परतफेड करून रक्कम दिलेली आहे. परंतु मुद्दाम पैसे उकळण्याच्या उद्देशाने हा खोटा खटला दाखल केला आहे. फिर्यादी तर्फे *अॅड विशाल बर्गे* यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की, चेक बाबत फिर्यादी गैरवापर करू नये म्हणुन आरोपीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही अथवा त्याच्या बॅंकेत जाऊन चेक बाबत स्टॉप पेमेंट केले नाही. तसेच वकिलांच्या नोटिशीला तत्काळ उत्तर देऊन स्वताची बाजू मांडली नाही. आरोपीने चेक वरील सही नाकारली नाही.
या युक्तिवादाच्या समर्थनार्थ सर्वोच्च न्यायालयाचे निकाल फिर्यादीचे वकील *श्री अँड विशाल बर्गे* यांनी कोर्टात सादर केले.
हा *अँड विशाल बर्गे* यांचा युक्तिवाद मान्य करून मे. कोर्टाने आरोपीस ६ महिने सश्रम तुरूंगवास, व ३ लाख दंड नुकसानभरपाई देण्याचा आदेश तारीख 22/9/2025 रोजी दिला. जर दंडाची रक्कम न भरल्यास पुन्हा १ महिना तुरुंगवास करण्यात येईल असा आदेश सुनावण्यात आला.
तब्बल ६ वर्षे न्यायालयीन प्रक्रिया चालु होती. फिर्यादी अभिजित थोरात व अँड. विशाल बर्गे यांच्या अत्यंत सबळ व ठोस पुराव्याच्या आधारावर आर्थिक फसवणुक करणार्या आरोपीला कठोर शिक्षा झाली. या निकालामुळे आर्थिक भुलथापा मारून गोरगरीब व सर्व सामान्यांना फसवणार्यांचे चांगलेच धाबे दणालले आहेत. या निकालाच्या यशामुळे अँड. विशाल बर्गे यांचे सर्वत्र कौतुक होत असताना दिसत आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा