बारामतीत शाहु हायस्कूल शेजारी हायवा ट्रकची स्कूल व्हॅनला धडक ! ४ विद्यार्थी थोडक्यात बचावले !!

बारामती: (महाराज्य टाईम्स) 
बारामती शहरातील पाडा रोड येथे शाहु हायस्कूल शेजारी आज संध्याकाळी ५ वां एक भरधाव हायवा ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कूल व्हॅनला जोरदार धडक दिली स्कूल व्हॅन मध्ये चार शालेय विद्यार्थी होते व ड्रायव्हर होता ड्रायव्हरने सांगितले की तो डाव्या साईडला गाडी उभी होती ख्रिश्चन कॉलनी मधून स्कूलच्या मागील रस्त्याने तो भरधाव वेगाने येऊन त्यांनी गाडीला फरफट पुढे नेलं त्यामध्ये गाडीचे नुकसान झालं पण चार विद्यार्थी थोडक्यात बचावले त्यांच्या जीवीतास धोका झाला नाही.
     हायवा ट्रकचा ड्रायव्हर चे नाव गणेश गायकवाड राहणार वसंत नगर असुन ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. सदर हायवा यास कुठलीही नंबर प्लेट नसल्याचे दिसून आले. गाडीचे नंबर प्लेट नसताना बेफिकीरपणे हायवा मालक रस्त्यावर गाडी चालवत आहेत. 
     सदर हायवा पोलीस विभागातील व्यक्तीचा असल्याचा नागरिकांमध्ये चर्चा होती. बारामती शहरामध्ये रोज घडणाऱ्या हायवा ट्रक डंपरच्या अपघातास कोण कारणीभूत असा सवाल नागरिक करत आहेत या गोष्टीवर पोलीस प्रशासनाचा बसणार आहे का नाही ?
      विकासाच्या नावाखाली अजून बारामती शहरातील नागरिकांचे किती बळी प्रशासन घेणार आहे या गोष्टी कुठेतरी थांबणार आहेत का नाहीत ? असाच खडा सवाल स्थानिक नागरिकांनी अत्यंत संतप्तपणे महाराज्य टाईम्स प्रतिनिधीशी बोलताना केला आहे.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक