विकासाच्या रस्त्यावर स्पिडब्रेकर व खड्यांचा दणका ! नागरिकांचा बाद होतोय पाठीचा मणका! !
बारामती शहरात विविध भागांमध्ये रस्त्यांची दुर्दशा तर झाली आहे ती पण खड्यांमुळे व गतिरोधकांमुळे. शहरामध्ये मुख्यतः भिगवण रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गतिरोधक(स्पिडब्रेकर) तयार केले आहेत त्यामुळे वाहनचालकांना पाठीच्या मणक्याचा त्रास सुरु झाल्याचे निदर्शनास आले आहे.
बारामती शहरात अनेक ठिकाणी विकासकसमे चालू असल्याचे दिसत आहे. मात्र नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन सुशोभिकरण करण्यावर जास्त भर दिला जातोय का? हा नागरिकांना प्रश्न पडला आहे. ठराविक रस्तांकडेच प्रशासन संपूर्णपणे लक्ष देत आहे. भिगवण रस्ता प्रचंड वाहतुकीचा झाला आहे. वाहनचालकांच्या सोईसाठी समांतर सर्व्हिस रोड पण आहेत. वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी नियमानुसार गतिरोधक असणे गरजेचे पण आहे. मात्र ते कशा पद्धतीने व किती बनवायचे हे सुद्धा शास्त्रोक्तपणे करणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन बनवले जात आहेत का? हा प्रश्न आहे.
गतिरोधकाची उंची, लांबी व प्रकार कसा असावा ह्याची एक एसोपी म्हणजेच पध्दत आहे. परंतू भिगवण रस्त्यावर स्पिडब्रेकर एक ते दिडफुट उंच बनवले आहेत. दोन्ही बाजूला तिव्र उतार देऊन वरती सपाट भाग पेवरब्लाॅक लाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे स्पिडब्रेकर चढताना जोरात हाताच्या खांद्याला, मानेला व पाठीच्या मणक्याला जोरात दणका बसत आहे. स्पिडब्रेकरवरुन उतरताना सुद्धा जोरात दणका पाठीला बसण्याचा अनुभव वाहनचालकांना रोजच असंख्यवेळा येत आहे.
अत्यंत चुकीच्या पद्धतीने बनवलेले गतिरोधक नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरले आहेत. पाठीच्या मणक्यांच्या मानेच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत त्यामुळे प्रशासनाच्या अशा कामांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. डांबरी रस्त्यांवर गोलाकार आकारात नियमानुसार गतिरोधक असले तरी वेगावर नियंत्रण होत असते पण असे धोकादायक १-२ फुटाचे उंच लाखों रुपये खर्चुन केलेले गतिरोधक नागरिकांच्या जिवाशी खेळण्यासाठी व ठेकेदारांचा फायदा करुन जनतेच्या पैशाची अमाप उधळपट्टी करण्यासाठी केले आहेत का? असा संतप्त सवाल वाहनचालक नागरिक प्रशासनाला व बारामतीच्या नेत्यांना विचारत आहेत.
बारामतीचे आमदार, खासदार, प्रांतअधिकारी, तहसीलदार, बांधकाम विभागाचे अधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी, उच्च पदस्थ पोलिस अधिकारी ह्या सर्व वरील व्यक्तींना किंवा त्यांच्या कुटुंबाला रस्त्यावर प्रवास करण्यासाठी चारचाकी सरकारी वाहन असते त्यामुळे यांना दुचाकीवर फिरावे लागत नाही किंवा कामासाठी दुचाकीवर खड्डे चुकवत स्पिडब्रेकरवर दणके खात प्रवास करावा लागत नाही. त्यामुळे वरील सर्व व्यक्तींना गांभीर्य कळणार नाही जनतेच्या त्रासाचे.
नियमानुसार पुढे गतिरोधक असल्याचे सुचना फलक लावणे बंधनकारक असताना त्याकडे पण प्रशासन निष्काळजीपणा करत आहे. तसेच महिनोनमहिने शहर व परिसरात मोठमोठे खोल खड्डे आहेत त्यामुळे अचानक गतिरोधक व खड्डे समोर आल्यावर वाहनचालकांना जोरात दणका बसून खाली पडतात व अपघात होत आहेत. या सर्व गोष्टींना संपूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे अशी नागरिकांनी तक्रार महाराज टाईम्स प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
दोन दिवसांपूर्वीच मा.उच्च न्यायालयाने खड्यांमुळे होणार्या अपघाताबाबत महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास प्रशासकीय अधिकार्यांना सुद्धा जबाबदारी धरले जावे. अपघातग्रस्त नागरिकांना ५०,००० रूपयांपेक्षा जास्त नुकसान भरपाई दिली पाहिजे असा निकाल दिला आहे. त्यानुसार बारामतीतील स्पिड ब्रेकर, खड्डे व नादुरूस्त रस्ते यामुळे जे अपघात झाले अपघातग्रस्त नागरिकांना भरपाई अधिकारी देणार का? याविषयी कठोर भुमिका बारामतीचे आमदार, खासदार घेणार का? ? असा सवाल नागरिक विचारत आहेत.
महाराज्य टाइम्सच्या प्रतिनिधीने शहरातील अस्थिरोग तज्ञांची या विषयी प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले कि, पाठीच्या मणक्यास किंवा मानेला जोराचा (जर्क) दणका बसला तर भविष्यात खुप गंभीर परिणाम होतात. हाता पायाला मुंग्या येणे किंवा कंबरेखाली कमकुवतपणा येतो. खाली वाकण्याचा व चालण्याचा त्रास होऊ शकतो.
बारामतीला गतिरोधकाचे गाव घोषित करायला काय हरकत आहे...??
उत्तर द्याहटवा