12 जिल्हा परिषद 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहिर: 5 फेब्रु. मतदान, तर 7 फेब्रु. रोजी मतमोजणी

महाराज्य टाईम्स: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान, तर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदांच्या एकूण 731, तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

वाघमारे यांनी सांगितले की, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीची सूचना 16 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध होईल. सूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी आपापल्या स्तरावर पार पाडतील. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 16 जानेवारीपासून सुरू होईल. उमेदवारांना 21 जानेवारीपर्यंत आपली उमेदवारी दाखल करता येईल.

खालील तक्त्यात पाहा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम:-

जिल्हा परिषदेच्या जागांचा तपशील

एकूण जिल्हा परिषदा - 12

एकूण जागा- 731

महिलांसाठी जागा- 369

अनुसूचित जातींसाठी जागा- 83

अनुसूचित जमातींसाठी जागा - 25

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा - 191

पंचायत समित्यांच्या जागांचा तपशील

एकूण पंचायत समित्या - 125

एकूण जागा- 1,462

महिलांसाठी जागा- 731

अनुसूचित जातींसाठी जागा - 166

अनुसूचित जमातींसाठी जागा - 38

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा - 342

15 फेब्रुवारीपर्यंत निवडणूक घेणे बंधनकारक:-

सर्वोच्च न्यायालयाने गतवर्षी राज्य निवडणूक आयोगाला 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, राज्यात पहिल्या टप्प्यात नगरपंचायत व नगरपरिषदांची निवडणूक झाली. त्यानंतर सध्या मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यासाठी वाढीव मुदत मागितली होती. पण कोर्टाने त्यांना अवघ्या 15 दिवसांची मुदत देत हा निवडणूक कार्यक्रम 15 फेब्रुवारीपर्यंत संपवण्याचे आदेश दिले.

त्यानुसार, राज्य निवडणूक आयोगाने आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. आयोगाच्या पत्रकानुसार, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसंदर्भात सह्याद्री अतिथिगृहात पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यात या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक