अतिक्रमण विभागाची धडाकेबाज कामगिरी! ! दबावाला न जुमानता काढले फ्लेक्सबोर्ड
बारामती नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक अत्यंत जोरदार पार पडली. निवडून आलेल्या उमेदवारांनी बेकायदेशीर लावलेले फ्लेक्स अतिक्रमण विभागाने दोन दिवस वाट बघून कुणाच्याही दबावाला न जुमानता काढून घेतले त्यामुळे नवनिर्वाचित उमेदवारांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
तब्बल ९ वर्षांनंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली होती अनेकांनी आपले नशिब अजमावले. अनेकांना अपयश मिळाले राजकिय वरदहस्त असणार्याना सुद्धा अपक्षांनी आस्मान दाखवले त्यामुळे निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामुळे निवडून आल्यावर आभाराचे मोठमोठे फ्लेक्स बॅनर लावण्याची चढाओढ दिसून आली. प्रत्येक नवनिर्वाचीत उमेदवाराचे कार्यकर्ते, संस्था व पक्ष यांनी शुभेच्छुक म्हणून बॅनर लावण्याचा उत्साह दाखवला खरा पण जिथं आपण नगरसेवक म्हणुन निवडून गेलो आहोत त्या नगरपालिकेची परवानगी घेतली आहे का बोर्ड लावण्याची याचा कोणीही उत्साहाच्या वातावरणात विचार केला नाही.
तरी नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने उत्साहावर विरजन नको म्हणून २-४ दिवस वाट बघितली व धडाकेबाज पणे बोर्ड उतरवण्याची मोहिम राबवली. अचानकपणे बोर्ड काढण्यासाठी कर्मचारी कामाला लागले तेव्हा काही राजकिय वरदहस्त असलेले नवनिर्वाचित नगरसेवक यांनी कर्मचार्यांना "बोर्डला हात लावला तर तुला आणि मुख्याधिकार्याला दाखवतो" असा सज्जड दम भरल्याचे काहीं कर्मचाऱ्यांची चर्चा बोर्ड काढताना नागरिकांना ऐकण्यास मिळाली. काही कर्मचार्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर महाराज्प टाईम्सशी बोलताना पुष्टी पण दिली.
अतिक्रमण विभागाचे कर्मचार्यांनी त्यांचे कर्तव्य चोख बजावले पण त्यांना नवनिर्वाचीत नगरसेवक जे नगरपालिकेच्या संस्थेत नगरसेवक म्हणून काम करणार आहेत त्यांनीच कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीर मोठमोठे बॅनर लावले असतील तर ते नगरपालिकेचे कर बुडवून सुरूवातच अनधिकृत करत असतील तर हे आदर्शव्रत नाही. असा संदेश समाजाजामध्ये गेला तर नगरपालिकेत नगरसेवकांची दंडेलशाही चालते काय? असा सवाल कर्मचारी विचारत होते.
कर्मचार्यांच्या कर्तव्य तत्परतेचे नागरिकांकडून समर्थन करण्यात येत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा