कामात विलंब व शासनाचे नुकसान केल्यामुळे ठेकेदार मयूर पानसरे यांना जि.प. ने टाकले काळ्या यादीत
महाराज्य टाईम्स: बारामती तालुक्यातील शासनाची विविध विकास योजनांची बांधकामे करणारे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर श्री. मयूर विकास पानसरे रा. शिर्सुफळ, ता. बारामती यांना कामात विलंब व शासनाचे नुकसान केल्याप्रकरणी काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मयूर पानसरे हे बारामती तालुक्याच्या कार्यक्षेत्रात आणि पुणे जिल्ह्यामध्ये इतरत्र लगतच्या तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा शासनाची बांधकामे व रोडची कामे ३ ते ४ वर्षापासून करीत होते. बऱ्याच ठिकाणच्या तक्रारी तोंडी आल्या होत्या. विलंबाने कामे करणे, कामांच्या मंजुरीच्या ठिकाणी न करता स्थानिक दबाबाला बळी पडुन मनमानीपणा करुन निकृष्ट दर्जाची कामे करत असले बाबतही तोंडी तक्रारी होत्या वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्याशी संगनमत करुन, कामाचे टेंडर मॅनेज करुन इतर दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला कामे मिळु देत नव्हते अशी माहिती माहिति अधिकार कार्यकर्ते पोपट धवडे यांनी दिली.
अशातच पुणे जिल्हा परिषद, पुणे बांधकाम विभाग (दक्षिण) यांच्याकडील जनसुविधा या कामाची लेखाशीर्षातर्गत निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार कामाचे नाव हरिभाऊ मुळे घर ते टिळेकर वस्ती हा रस्ता करणे, शिर्सुफळ तालुका बारामती येथील काम हे ठेकेदार मयूर विकास पानसरे यांनी - ४०% कमी दराने हे काम भरले होते त्यानुसार ते काम त्यांना मिळाले होते या कामाची अतिरिक्त सुरक्षा ठेव व लिफाफा क्रमांक २ उघडल्यानंतरनं प्रथम देयकार सादर करणाऱ्या एल. वन निविदाकाराने म्हणजेच ठेकेदार मयूर पानसरे यांनी अँडिशनल सिक्युरिटी डिपॉझिट रक्कम ही ८ दिवसाच्या आत संबंधित कार्यकारी अभियंता यांचेकडे भरणे बंधनकारक होते परंतु १८ दिवस उलटूनही अतिरिक्त अनामत रक्कम संबंधित ठेकेदार यांनी भरलेली नाही.
या कृतीमुळे शासनाचे आर्थिक नुकसान व विकास कामे प्रलंबित राहणेस प्रथम दर्शनी ठेकेदार मयूर पानसरे जबाबदार आहेत हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे श्री. पोपट विठोबा धवडे सामाजिक कार्यकर्ते यांचा दि.०१-१२- २०२५ तक्रारी अर्ज व मेलद्वारे पुणे जिल्हा परिषद पुणे बांधकाम विभाग (दक्षिण) यांना केलेली तक्रार, या तक्रारीवर पुणे जिल्हा परिषद यांनी ठेकेदार श्री. मयूर विकास पानसरे महाराष्ट्र शासन, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे शासन निर्णय क्र.सीएटी-२०१७/ प्र.क.८/इमा-२ दि. २९/०१/ २०१९ मधील प्रकरण ७ नुसार पुणे जिल्हा परिषद पुणे कडील निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेण्यास आदेशाच्या दिनांक. २२/१२/२०२५ पासून एक वर्षासाठी प्रतिबंद म्हणजेच काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) करण्यात आलेले आहे असे पोपट धवडे यांनी महाराज्य टाईम्सला सांगितले.
"" ठेकेदार मयूर पानसरे यांच्यासारखे काही कॉन्ट्रॅक्टर आपल्या जिल्ह्यात आणि राज्यात अशा प्रकारचे चुकीची कामे करत आहेत व बेकायदेशीर कामे करीत आहेत. त्यामुळे शासनाकडून येणारा निधी व त्याचा वापर नीट होत नसल्याने कामे निकृष्ट होत आहेत. समाज त्यामध्ये भरडला जातोय आणि कामे खराब झाल्यामुळे ती कामे पुन्हा रिपेअर करण्याची कामे आणि पुन्हा नव्याने कामे करणे होऊन शासनाला आर्थिक भुर्दंड बसत आहे. अशा ठेकेदारांना एक वर्षासाठी निलंबित न करता कायमस्वरूपी निलंबित करणे गरजेचे आहे म्हणजे इतर काम चुकार चुकीचे कामे करणाऱ्या ठेकेदारांवर जरब बसेल असे माझे सामाजिक कार्यकर्ता म्हणून स्पष्ट मत आहे. ""
- - पोपट विठोबा धवडे बारामती

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा