माळेगांव-खांडज खूनप्रकरणी संशयित आरोपीस जामीन मंजूर
सर्वोच्च न्यायालयातील निवाड्याचा युक्तिवाद ग्राह्य
बारामती, दि. ४ (महाराज्य टाईम्स)
माळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खांडज गावामध्ये एकाचा गावातील विहिरीमध्ये मृतदेह आढळला होता. याप्रकरणातील संशयित आरोपीस अटक केली होती. याप्रकरणी बारामती न्यायालयात आरोपीच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात निवाड्याचा संदर्भ दिल्याने युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीला जामीन मंजूर केला.
ही घटना (दि.५) मे २०२५ रोजी घडली आहे. खांडजमधील मृतदेह ज्या व्यक्तीचा होता. त्याच्या मुलाने माळेगाव पोलिसांत फिर्यादी दिली होती. प्रथम दर्शनी तपासात मालेगाव पोलिसांनी २ जणांस संशयित म्हणून (दि.८) मे रोजी अटक केली होती. तेव्हापासून दोन्ही आरोपी येरवडा येथील कारागृहात होते.
आरोपी अनिल बबन जाधव यांच्यातर्फे बारामती येथील अँड. शुभंकर राजेश बाचल यांनी आरोपीस जामीन मिळण्याकरिता बारामती न्यायालयात (दि.८) डिसेंबर रोजी अर्ज दाखल केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश हेतेंद्र वाणी यांच्यासमोर जामीन अर्जावर सुनावणी होऊन त्यात आरोपीतर्फे त्याच्या वकिलांनी पुराव्याची अस्पष्टता, परिस्थितीजन्य पुराव्यांवर अवलंबून व इतर महत्वाच्या मुद्यांवर युक्तिवाद केला.
युक्तिवादासोबतच दिल्ली सर्वोच्च न्यायालय, अन्य राज्यांतील उच्च न्यायालयांचे न्यायनिवाड्याचे संदर्भ दाखले देत युक्तीवाद केला. हा युक्तीवाद न्यायालयास योग्य वाटल्याने युक्तिवादातील अनेक मुद्दे ग्राह्य धरून ५० हजार रुपयांच्या मुचलक्यावर व अटी व शर्तीवर आरोपी अनिल बबन जाधव यास (दि.३) रोजी जामिनावर मुक्त केले. हे कामकाज मुंबई उच्च न्यायालय, पुणे जिल्हा व सत्र न्यायालय व बारामती अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय येथे कामकाज करत असणारे अत्यंत उत्तम व प्रखरपणे युक्तिवाद करणारे म्हणुन प्रसिद्ध असणारे विधिज्ञ अँड. शुभंकर राजेश बाचल यांनी पाहिले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा