संभाजी होळकर यांची राष्ट्रवादी(अप) पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड !!
महाराज्य टाईम्स:बारामती
राष्ट्रवादी(अजित पवार) काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी पक्षाचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांनी नियुक्ती पत्राद्वारे जाहिर केली आहे.
संभाजीनाना होळकर हे बारामती तालुक्यातील होळ गावचे सुपुत्र असुन राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपुर्वी पासून ते अजित पवार यांचे कट्टर समर्थक व कार्यकर्ते आहेत. राष्ट्रवादी पार्टीच्या माध्यमातून त्यांनी विविध संस्थांमध्ये अनेक पदे भुषविली आहेत. प्रामुख्याने बारामती तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद, सभापती, सार्वजनिक बांधकाम व आरोग्य समिती जि.प.पुणे, बारामती तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पदांवर उत्तम काम केलेले आहे. तसेच सध्या ते संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँक,पुणे या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या मृदुभाषी स्वभावामुळे असंख्य कार्यकर्ते त्यांच्या सोबत राष्ट्रवादी पक्षाचे काम उत्तमपणे करत आहेत.
त्यांच्या उत्तम जनसंपर्क व कार्यपद्धतीचा विचार करुन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांनी संभाजी होळकर यांची पुणे जिल्हा ग्रामीण (बारामती, इंदापूर, दौंड) अध्यक्ष पदी नियुक्ती एका पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे तीन तालुक्यातील त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत समाधान व आनंद व्यक्त होताना दिसत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा