कामाचा माणूस म्हणून निवडून दिले अपक्ष! ! पण प्रभागात कामांसाठी कधी देणार लक्ष ?

महाराज्य टाईम्स:दि.१३
     बारामती सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. ४१ नगरसेवकांनी आपले नशीब अजामावुन यश संपादन केले.
३५ नगरसेवकांना पक्षाची व आर्थिक ताकद पुरविण्यात आली होती. परंतू ६ अपक्ष नगरसेवकांनी स्वतःच्या हिमतीवर व नागरिकांच्या प्रेमावर व पाठिंब्यावर प्रस्थापित सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना चितपट करत विजय मिळवला आहे.
    पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना राजकिय वरदहस्ताने व कार्यकर्त्यांच्या सतत प्रचार करण्यामुळे विजय मिळवता आला हे मात्र नक्की खरयं. परंतू अपक्ष उमेदवार हे सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात उभे राहिल्यामुळे कार्यकर्त्यांची कमतरता व प्रचार मर्यादित असल्यामुळे विजय मिळेल याची शाश्वती नव्हती. परंतू नागरिकांनी काही प्रभागात कामाचा माणूस म्हणून विश्वास ठेऊन तब्बल ६ अपक्ष निवडून दिले आहेत.
    सर्व साधारणपणे नागरिकांच्या मूलभूत गरजा असतात रस्ते, वीज, पाणी व आरोग्यसेवा यासाठी लोकांना प्रतिनिधी हवा असतो तो पण जनतेसाठी काम करणारा व वेळप्रसंगी हाक मारल्यास फोन केल्यास येणारा. परंतू निवडणुकीच्या प्रचारासाठी घरोघरी जाणारे अपक्ष उमेदवार आता विजयी झाल्यावर नागरिकांचे फोन सुद्धा घेत नाहीत किंवा परत सुद्धा करत नसल्याचे प्रभागातील मतदार नागरिकांनी महाराज्य टाइम्सच्या प्रतिनिधी कडे भावना व्यक्त केली. बर्याच नागरिकांनी अपक्ष निवडून दिलेल्या नगरसेवकाला कामांची यादी दिली आहे. पण नगरसेवक मात्र "गरज सरो वैद्य मरो"
"रात गयी बात गयी" असे वागत आहेत का? असे मतदार नागरिकांमध्ये चर्चा चालू आहे.
   राजकिय सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक त्यांच्या पक्षाच्या ताकदीवर नागरिकांची कामे मार्गी लावणार पण अपक्ष विरोधात निवडून आले असल्यामुळे त्यांना कामे मार्गी लावण्यासाठी कसरत करावी लागणार हे मात्र नक्की आहे.
कुठल्या प्रभागातील नगरसेवक निवडून आल्यावर मतदारांना टाळत आहेत. त्यांची नावे पुढील बातमीमध्ये पुराव्यानिशी जाहिर करावी अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक