श्रीमंत बाबूजी नाईक मित्र मंडळामध्ये साजरा झाला भव्य दिव्य गणेशजन्म सोहळा! !



बारामती : (महाराज्य टाईम्स्) माघ महिन्यात श्री गणेश जन्म संपुर्ण भारतात श्री गणेश मंदिरांमध्ये खुप भक्ती भावाने साजरा केला जातो. त्याप्रमाणेच बारामती शहरात सुद्धा अनेक मंदिरांमध्ये व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीने अत्यंत धार्मिक वातावरणात भक्तीभावे गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे.
   आज माघ शुद्ध प्रतिपदा. माघ मासाची सुरुवात आणि गणेश जन्माची चाहूल. वास्तविक पाहता गणपतीच्या अनेक अवतारांपैकी आपण *श्रीमहोत्कट विनायक* अवताराचा जन्म माघात साजरा करतो. माघ मासाच्या शुद्ध चतुर्थी तिथीस 'श्री महोत्कट विनायक' नावाने  आदिती आणि कश्यप ऋषींच्या आश्रमी माध्यान्ही अवतार घेतला. मत्सरासुर पुत्र देवांतक आणि नरांतक या असूर बंधूंच्या वधासाठी आणि भक्तकल्याणासाठी हा अवतार झाला.
    बारामती शहरातील सिद्धेश्वर मंदिराजवळ श्रीमंत बाबूजी नाईक मित्र मंडळ यांंच्या वतीने गणेश जयंती उत्सव गुरुवार २२ जानेवारी रोजी अत्यंत मनोभावे धार्मिक व उल्हासपुर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. दुपारी १२ वाजतां शेकडो भक्तगण व मंडळाचे कार्यकर्ते आरती सोहळ्यासाठी आवर्जुन उपस्थित होते. गणपती मंदिराचा परिसर आकर्षक मंडप व रोषणाई करून सजविण्यात आला होता. गणेश मूर्तीला सुंदर मौल्यवान अलंकार परिधान करण्यात आले होते. त्यामुळे तर गणेश मुर्तीचे रुप अत्यंत देखणे व सुंदर दिसत होते.
    श्रीमंत बाबुजी नाईक मित्र मंडळाच्या वतीने संध्याकाळी, ७ वाजलेनंतर गणेश भक्तांसाठी मिष्टान्न भोजन महाप्रसाधाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने जवळपास १२०० गणेश भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. गणेश जयंतीच्या विलोभनीय सोहळ्याला बारामतीतील अनेक मान्यवरांनी प्रामुख्याने सर्व नवनिर्वाचीत नगरसेवक व नगराध्यक्ष सचिन सातव यांनी उपस्थिती दिली व दर्शनाचा लाभ घेतला.
   श्रीमंत बाबुजी नाईक मित्र मंडळ अत्यंत प्रसिध्द व जुने मंडळ आहे. गणेशोत्सवात मानाचा गणपती म्हणून त्याची ओळख आहे. मंडळाच्या वतीने धार्मिक कार्यक्रमाबरोबरच विधायक व सामाजिक कार्य करण्यात येतात. मंडळाचे सर्वच कार्यकर्ते अत्यंत तळमळीने व उल्हासाने सहभाग घेत असतात. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष जयकुमार जाधव व मंडळाचे जेष्ठ सभासद विकास खोत यांनी महाराज्य टाईम्सला दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक