बारामती नगर परिषदेचे पर्यावरणपूर्वक श्रीगणेश विसर्जनासाठी उत्तम नियोजन !!

बारामती शहरामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून श्री गणेश मूर्तींचे विसर्जनासाठी उत्तम नियोजन करण्यात आले आहे. बारामती शहरामध्ये विविध ४० भागांमध्ये कृत्रिम विसर्जन जलकुंड व निर्माल्य संकलन व्यवस्था करण्यात आली आहे.
लाडक्या गणरायाच्या मूर्ती विसर्जनासाठी नगर परिषदेने उत्तम नियोजन व तयारी केली आहे. बारामती शहरामध्ये विविध भागांमध्ये तब्बल 40 ठिकाणी कृत्रिम विसर्जन जलकुंड व निर्माल्य कलश ची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण विसर्जन होईपर्यंत पूर्णवेळ मनुष्यबळाची तरतूद करण्यात आली आहे.
नागरिकांनी नैसर्गिक जलस्रोत जसे की नदी नाले ओढे तलाव कॅनॉल या ठिकाणी मूर्ती विसर्जन न करता पर्यावरण पूर्वक मूर्ती विसर्जन करावे यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी गणेश मूर्ती व निर्माण्य नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त करावे जेणेकरून त्या मूर्ती संकलित करून नगरपरिषद ही योग्य पद्धतीने भक्ती भावाने एका मोठ्या विहिरीमध्ये ती विसर्जित करण्यात येत आहे.
त्यामुळे नागरिकांनी नगरपरिषदेच्या या पर्यावरण पूर्वक श्री गणेश मूर्ती विसर्जनाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून मूर्ती नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करण्याकडे कल वाढला आहे.
काही नागरिकांनी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये मृत्यू विसर्जन केल्यानंतर दहा दिवस मनोभावे पुजा अर्चा केल्यानंतर विसर्जनाच्या वेळेस मूर्ती भंग पावल्याच्या अनेक घटना प्रत्यक्ष दर्शनी बघितल्या असल्यामुळे नगरपरिषदेच्या उपक्रमात मूर्ती सुपूर्द करणे अनेकांनी पसंत केला आहे.
नगरपरिषदेच्या या उपक्रमाच्या आयोजनामध्ये मुख्याधिकारी पंकज भुसे, नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्ष सौ.श्वेता नाळे व इतर स्थानिक नगरसेवक यांनी पाहणी करून सहभाग घेतला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा