माळेगाव खुनाचा प्रयत्न प्रकरण: बारामती पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन



माळेगावातील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध; रेकॉर्डवरील सराईतांची पडताळणी, घातक शस्त्रे व संशयित वाहनांवर विशेष नजर

(महाराज्य टाईम्स) बारामती : माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यानंतर आरोपींचा शोध वेगाने घेण्यासाठी आणि बारामती शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रतिबंधात्मक नियंत्रण अधिक मजबूत करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चैतन्य कदम यांच्या नेतृत्वाखाली आमराई परिसरात व्यापक कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

माळेगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २६१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम १०९, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० तसेच शस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम ४ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

फिर्यादीनुसार, दि. २८/०९/२०२६ रोजी रात्री सुमारे २०.०० वाजता माळेगाव बु. येथील तावरे पेट्रोल पंप परिसरात पूर्वीचे भांडण सोडविल्याचा राग मनात धरून काही आरोपींनी धारदार लोखंडी कोयत्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेत संदीप दत्तात्रय जगताप, अनिकेत उदयसिंह धुमाळ व पृथ्वीराज अतुल निंबाळकर जखमी झाले. प्रकरणात गणेश भोसले, शुभम मोरे, मयूर रामचंद्र शितोळे, प्रेम कांबळे, हर्षद रणधीर, भुमेश झेंडे व इतर ६ ते ७ इसम आरोपी म्हणून नमूद आहेत.

या पार्श्वभूमीवर प्रेम कांबळे, शुभम मोरे व गणेश भोसले यांचा शोध घेण्यासाठी आमराई परिसरातील संभाव्य वास्तव्यस्थळे, संपर्कस्थळे आणि संशयित हालचालींची तपासणी करण्यात आली. त्याचवेळी गंभीर व शरीरविषयक गुन्ह्यांमध्ये वारंवार नोंद असलेल्या व्यक्तींचीही कायदेशीर पडताळणी करण्यात आली.

या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये प्रभारी परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती मनीषा ओमासे, पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, सहायक पोलीस निरीक्षक श्री. शशिकांत इंगवले, पोलीस उपनिरीक्षक श्री. सर्जेराव पुजारी, सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री. संजय जाधव, तपास पथकातील अंमलदार तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनमधील पुरुष व महिला अंमलदार असे एकूण ६ अधिकारी आणि सुमारे ५० पोलीस अंमलदार सहभागी झाले.



बारामती शहर पोलीस स्टेशनच्या अभिलेखातील गुन्ह्यांची नोंद असलेल्या व्यक्तींच्या वास्तव्याची व हालचालींचीही तपासणी करण्यात आली. या अभिलेखात हर्षद राजु काकडे बागवान, धनाजी/धनंजय आत्माराम पाथरकर, धीरज रविंद्र पडकर, निहाल उर्फ रावण विजय दामोदरे, गणेश तुळशीराम पवार, अमर आत्माराम पाथरकर, आदेश संजय कुचेकर, सुनिल संभाजी माने, रोहित केशव जगताप, लाला आत्माराम पाथरकर, सचिन आत्माराम पाथरकर, वैभव उर्फ गुडड्या बाबु बगाडे, निलेश प्रदिप उमरदंड, यश उर्फ मंगेश सुभाष मदने, धिरज दशरथ थोरात, विठ्ठल उर्फ छोट्या यल्लाप्पा पवार, यश दीपक मोहिते, अक्षय उर्फ आकाश उर्फ भो-या बापूराव जाधव, बालाजी उर्फ बाल्या अनिल माने, अमिन दिलावर इनामदार व नितीन बाळासाहेब तांबे यांची नावे नमूद आहेत. 

या ठिकाणी अग्निशस्त्रे, कोयते, तलवारी किंवा अन्य बेकायदेशीर जीवघेणी हत्यारे साठवली अथवा बाळगली जात आहेत काय, फरार आरोपींना आश्रय दिला जात आहे काय आणि गुन्हेगारी कृत्यास मदत करणारी साधनसामग्री उपलब्ध आहे काय, याची कायदेशीर चौकटीत पडताळणी करण्यात आली.

तसेच आमराई भागात नंबरप्लेट नसलेली, संशयास्पदरीत्या उभी असलेली आणि वाहनचोरीच्या अनुषंगाने पडताळणी आवश्यक असलेली वाहने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आली. संबंधित वाहनांची कागदपत्रे, इंजिन नंबर, चेसिस नंबर आणि पोलीस अभिलेख तपासण्यात येत असून, चोरीचे वाहन आढळल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध स्वतंत्र कायदेशीर कारवाई करून वाहन मूळ मालकास परत देण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चैतन्य कदम यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली.

बारामती शहर पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, गंभीर गुन्हा करून फरार होणे, शस्त्रांच्या जोरावर दहशत निर्माण करणे, आरोपींना आश्रय देणे किंवा गुन्हेगारी कृत्यास मदत करणे याकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले जाईल. प्रत्येक कारवाई पुरावे, कायदेशीर प्रक्रिया आणि लागू तरतुदींच्या आधारेच केली जाईल.

कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांनी निर्भय राहावे; परंतु गुन्हेगारी करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की बारामती शहर पोलिसांची नजर आणि कायद्याची पकड दोन्ही सातत्याने कार्यरत आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर सतत नजर; सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य.
   --- श्रीशैल चिवडशेट्टी, पोलीस निरीक्षक




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक