पिण्यासाठी गटारीचे मिश्रित पाणी देऊन नगरपरिषद करत आहे नागरीकांच्या आरोग्याशी खेळ !! स्व.अजितदादांच्या कार्यकर्त्यावर आमरण उपोषणाची वेळ

महाराज्य टाईम्स: 
     बारामती नगरपरिषद चा प्रभाग 16 मधील नागरिकाच्या आरोग्याशी खेळ 
        बारामती येथील प्रभाग क्रमांक 16 मधील बुरुड गल्ली भागात गेली 3 महिने पिण्याचे पाणी आणि गटारीचे पाणी मिश्रित होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
जुलाब,उलट्या,ताप याने नागरिक 3 महिने त्रस्त आहेत परंतु नगरपालिका प्रशासन कोणाच्या तरी दबावामुळे पाईप येऊन पडले तरी काम सुरू करत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. 
     गटारीचे पाणी पिऊन एखादा मृत्युमुखी पडल्यास नगरपालिका त्या घराची काय भरपाई करणार. काविळ सारखा गंभीर आजार व इतर काही रोग जर नागरिकांना झाला तर त्यांचा दवाखाना खर्च नगरपालिका उचलणार आहे का ? 3 महिने पत्र व्यवहार करून सुद्धा न्याय मिळत नसल्याने आज बुरुड गल्लीतील नागरिकांसाठी सामाजिक कार्यकर्ता श्रीकांत जाधव आमरण उपोषण करायला बसले होते. यांच्या सोबत शुभम भंडारे,स्थानिक नागरिक महेश नवसारे, रणजीत चव्हाण, दिनेश नवसारे महिला नागरिकांनी उपोषणात भाग घेतला.

.   (नागरीकांना मिळालेले गटारीचे मिश्रित पाणी)

   मुख्याधिकारी सर्व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असताना वारंवार दिसून येत आहे. परंतु नगरसेवकांनी दबाव आणला तरच मुख्याधिकारी काम करतात का? असा सवाल श्रीकांत जाधव यांनी नागरीकांच्या वतीने अत्यंत प्रखरपणे विचारला आहे. 
    स्व.अजितदादा गेल्यापासून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर कुठलाही अंकुश राहिलेला नाही अशी त्यांनी खदखद व्यक्त केली. बारामती शहरामध्ये गटारीचे पाणी मिश्रित पाणी प्यावे लागते हे दुर्दैव आहे असे म्हणावे लागेल अशी परिस्थिती आहे.
    अखेर श्रीकांत जाधव यांच्या उपोषणाला यश मिळाले आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी वस्तुस्थिती बघून संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी तसे निवेदन स्वीकारून त्या विभागाला सूचना दिल्या आहेत अशी माहिती मिळाली आहे.
   नागरिकांनी मुलभुत सुविधा मिळण्यासाठी आंदोलन केले तरच दखल घेतली जाते का?
श्रीकांत जाधव यांनी नागरीकांच्या वतीने ३ महिन्यांपासून पाठपुरावा केला तरी मुख्याधिकारी यांनी दखल घेतली नाही. मग
मुख्याधिकारी जनतेच्या प्रश्नांच्या निवेदनांना केराची टोपली दाखवत आहेत असे म्हणावे लागेल. असा सवाल नागरिकांना पडला आहे?


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक