पोस्ट्स

सणासुदीला होतोय प्रवाशांची अडवणूक? करोडोच्या स्टँडच्या खर्चामुळे होतेय आर्थिक पिळवणूक?

इमेज
          (पुणे व कोल्हापूर कडे जाणार्या शिवशाही बसेस ) महाराज्य टाईम्स:(26 आँगस्ट) सणासुदीच्या व उत्सवाच्या दिवसात बारामती बसस्थानकात प्रवाशांच्या गडबडीच्या वेळेला शिवशाही बस लाऊन जादा भाडे वसूल करण्यासाठी आर्थिक पिळवणूक करुन दुसरा पर्याय नसल्याने अडवणूक केली जात असल्याचे दिसून येत आहे.    ऐन सणासुदीच्या दिवसात नागरिकांना आपल्या घरी जाण्यासाठी किंवा कामावर हजर होण्यासाठी प्रवास करावा लागतो. अशा वेळेस सकाळी सकाळी लवकर पोहचण्याची प्रत्येकालाच घाई व गडबड असते. बसस्थानकात पोहचले की, सकाळी गर्दी व रांग असतेच पण एकावेळेस तीन चार शिवशाही बसेस फलाटाला लागलेल्या असतात. जर प्रवासला साध्या बसने जायचे असेल तर तो दुसर्या साध्या बससाठी वाट बघतो. पण साध्या बसची वाट बघायची वेळ येऊच नये व शिवशाही बसेस लागोपाठ सोडल्या जातात. अशा वेळेस प्रवाशांना कुठलाच पर्याय उरत नाही. मग आर्थिक भुर्दंड व मनस्ताप करुन तिकिट घ्यावेच लागते. जिथं साध्या बसचे पुण्याचे तिकिट भाडे १७७ रु. आहे तर शिवशाहीचे २६० रू म्हणजेच जवळपास १०० रु चा नाहक भुर्दड प्रवाशांना सोसावा लागतो. का तर ...

गणेशोत्सवाला आता राज्य महोत्सवाचा दर्जा: सार्वजनिक मंडळांना 7 दिवस सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत ध्वनिक्षेपकाला परवानगी

इमेज
महाराज्य टाईम्स:  राज्य शासनाने गणेश उत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळाला ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवादरम्यान ७ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी निर्गमित केला आहे.     ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराच्या निर्बंधास सूट दिल्याबाबत यापूर्वीच्या ३१ जानेवारी २०२५ रोजीच्या आदेशात बदल करून हे सुधारित आदेश जारी करण्यात आले आहेत. यानुसार गणेशोत्सवासाठी शनिवार ३० ऑगस्ट, रविवार ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर, २ सप्टेंबर, ३ सप्टेंबर, ४ सप्टेंबर, ६ सप्टेंबर या एकूण ७ दिवसांच्या कालावधीत सदर निर्बंधांना सूट देण्यात आली आहे.      नवरात्री उत्सवासाठी बुधवार १ ऑक्टोबर व गुरुवार २ ऑक्टोबर, ख्रिसमससाठी गुरुवार २५ डिसेंबर आणि वर्षाअखेरसाठी बुधवार ३१ डिसेंबर रोजीही या निर्बंधांना सूट देण्यात आली आहे. तसेच महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार परवानगी देण्याच्या अन...

स्वातंत्र्यदिना दिवशीच १७ वाहनांवर वाहतुक पोलिसांची धडक कारवाई; १२ अल्पवयीन मुलांचा समावेश

इमेज
*देशभक्तीच्या दिवशी नियमभंगाविरुद्ध वाहतूक पोलिसांची धडक मोहीम* बारामती दि.१५ (महाराज्य टाईम्स)     स्वातंत्र्य दिनाच्या देशभक्तीच्या उत्सवात काही तरुणांनी देशभक्तीपेक्षा 'दणका' आणि 'थाट' दाखवण्याचा प्रयत्न केला. बुलेटवर कानठळ्या बसवणारे सायलेंसर, स्पोर्ट्स बाईकचा अति वेग, ट्रिपल सीट मस्ती आणि वेडीवाकडी वाहने चालवून सुसाट गाडी पळवण्याचा रोडशो त्यांनी शाळा-काॅलेजच्या रस्त्यांवर उभा केला. मात्र बारामती वाहतूक पोलिसांनी दाखवलेल्या सजगतेसमोर त्यांचा हा  'रोडशो' काही क्षणात थंडावला.         एम.ई.एस.शाळा, बालविकास शाळा, देशपांडे शाळा, टेक्निकल हायस्कूल, अनेकांत शाळा या परिसरात सकाळपासूनच उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी वाहतूक शाखेची विशेष पथके तैनात केली. या पथकांनी अभ्यासपूर्वक नाकाबंदी केली. काही वाहने पकडण्यासाठी पोलिसांनी प्रत्यक्ष पाठलाग केला. ट्रिपल सीट बसून, मोठा आवाज करत, अति वेगाने व झिगझॅग वाहन चालवणाऱ्यांना थेट जागीच थांबवून दंड ठोठावला. आजच्या मोहिमेत एकूण १७ वाहनांवर दंडात्मक कारवाई झाली. त्यात ९ बुलेट, १ यामाहा, १ केटी...

बारामतीत स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज स्तंभाचे होणार लोकार्पण

इमेज
बारामती (महाराज्य टाईम्स): राष्ट्रभक्तीचे जाज्वल्य प्रतिक असलेला बारामती शहरातील सर्वात उंच राष्ट्रध्वज स्तंभ येत्या स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) लोकार्पित केला जाणार आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या हस्ते  व राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता तीन हत्ती चौकातील नटराज नाटय कला मंदीरासमोरील जागेमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांनी ही माहिती दिली.   बारामती शहरात सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) तीस मीटर उंचीचा (शंभर फूट उंच) राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून हा स्तंभ साकारण्यात आला आहे. बारामतीला स्वातंत्र्य चळवळीसह स्वातंत्र्य सैनिकांचा वैभवशाली वारसा आहे. या पार्श्वभूमीवर देशभक्ती अधिक जाज्वल्य व्हावी या उद्देशाने हा स्तंभ उभारण्यात आल्याचे किरण गुजर यांनी नमूद केले.  दरम्यान राष्ट्रध्वज स्तंभ लोकार्पण सोहळ्यानिमित्त देशभक्तीपर गीत व नृत्यांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे, सोबतच फटाक्यांची आतषब...

स्वातंत्र्य सैनिकांच्या उपोषणाला खा.शरद पवारसाहेब व युगेंद्र पवार यांचा जाहिर पाठिंबा

इमेज
बारामती दि.१४ (महाराज्य टाईम्स) शहरातील भिगवण चौक येथील हुतात्मा स्तंभ इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सदर हुतात्मा स्तंभ अन्य ठिकाणी हलवू नये,  या मागणीसाठी  राज्यातील स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे उत्तराधीकारी निषेध व्यक्त करण्यासाठी नगर परिषदच्या प्रवेशद्वारावर लाक्षणिक उपोषण करत आहेत.     सदर उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) चे नेते युगेंद्रदादा पवार हे उपस्थित राहिले होते. त्यांनी भाषणामध्ये हुत्मात्मा स्तंभ अडगळीच्या जागी हलवण्याच्या निर्णयाला कडाडून ठामपणे विरोध केला. आदरणीय शरद पवार साहेब ब मी स्वातंत्र्य सैनिकांच्या भुमिकेसोबत असुन उपोषणाला १००% पाठिंबा देत आहोत असे सांगितले. युगेंद्र पवार पुढे म्हणाले विकास काय सगळेच करतात आम्ही करतो तुम्ही करता पण हुतात्म्यांचा अवमान करुन विकास करत असाल तर आमचा ठाम विरोध आहे. पवार साहेबांना विद्यार्थी दशेत व राजकिय जिवनात तालुक्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे कायम त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत हे जाहीरपणे मी सांगतो.     ...

नाव मोठ्ठ लक्षण खोठ्ठं !! एसटी स्टँडवर रक्षाबंधनलाच लाडक्या बहिणींचे हाल?

इमेज
बारामती: (दि.१० महाराज्य टाईम्स)       बारामतीत विमानतळासारख्या दिसणार्या एसटी स्टँडवर गाड्याच्या निकृष्ठ नियोजनामुळे ऐन रक्षाबंधन दिवसालाच लाडक्या बहिणीला होतोय प्रचंड त्रास      शनिवार रविवार व रक्षाबंधन सलग असल्यामुळे बारामतीत बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती. बाहेरगावाहून अनेक परिवार आले आहेत. आपल्या भावाला राखी बांधायला तर काही भाऊ बहिणींकडे जात आहेत. त्यामुळे बारामती एसटी स्टँडवर सणासुदीमुळे प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आली. विमानतळासारखे दिसणारे बसस्थानक असे नावाजले गेले पण प्रत्यक्षात जैसे थे परिस्थिती बघायला मिळत आहे. असुविधांच्या बाबतीत अनेक पत्रकारांनी लेखणीच्या व बातमीच्या माध्यमातून आवाज उठवला पण ढिम्म प्रशासन कानाडोळा करत असताना दिसतोय का? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.      आज रविवार असल्यामुळे महिलांची प्रचंड गर्दी स्टँडवर होती. आणि जास्त करुन दौंड व इंदापुरला जाणार्या गाड्यांच्या फलाटावर अति प्रमाणात महिलां गाड्यांची वाट बघत ताटकळत केविलवाण्या चेहर्यानि उभ्या असलेल्या दिसल्या. बर्याच लाडक्या बहिणींनी महाराज्य ...

स्वातंत्र्याच्या क्रांतीविरांना मानवंदना देण्यासाठी उद्या क्रांतीदिन साजरा करण्याचे आयोजन

इमेज
महाराज्य टाईम्स(८ आँगस्ट): क्रांती दिनाच्या आठवणी उजळ करण्यासाठी शनिवार ९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता हुतात्मा स्तंभ वंदे मातरम चौक, (भिगवण चौक) या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन      ब्रिटिशांची दीडशे (१५०) वर्ष जुलमी राजवट आपल्या देशावर होती. या पारतंत्र्याच्या जोखंड्यातून जनतेला मुक्त करण्यासाठी सण अठराशे सत्तावन (१८५७) पासून वासुदेव बळवंत फडके या आद्य क्रांतिकारकापासून अनेक वीरांनी प्राणाची आहुती दिली आहे. १९४२ पर्यंत स्वातंत्र्य आंदोलनाची धार जनतेच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये निर्माण झाली होती. अनेक क्रांतिकारकांनी शसस्त्र उठाव केला. नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली.प्रत्येक जण आपापल्या विचाराप्रमाणे व शक्तीप्रमाणे कार्यरत राहिले.         दिनांक ८ ऑगस्ट १९४२ हा दिवस एक आगळा आणि वेगळ्या घटनांनी जागतिक इतिहासात अजरामर झाला.त्यादिवशी मुंबई येथील गोवा लिया टॅंक या मैदानावर अखिल भारतीय काँग्रेसची बैठक झाली.आणि त्या बैठकीमध्ये अहिंसक आणि सत्याग्रही मार्गाने चळवळीचा विडा उचललेल्या पूज्य महात्मा गांधींनी *"चलेजाव" (...

ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात सोमवारी मासिक शिवरात्र कीर्तन महोत्सव व महाप्रसादाचे आयोजन

इमेज
महाराज्य टाईम्स: दि.२२      बारामतीचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर येथे दर महिन्याला येणार्या शिवरात्रीला कीर्तन व महाप्रसादाचे सोमवार दि. २३ जुन रोजी करण्यात आले आहे.    ज्याप्रमाणे वर्षातुन एकदा महाशिवरात्री असते त्यावेळेस जगभरात सर्व शिवमंदिरात महाउत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. तसेच दर महिन्याला सुद्धा तिथीनुसार शिवरात्र येत असते. प्रत्येक महिन्याला येणार्या शिवरात्रीला शिवभक्त मनोभावे शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात काही जण उपवास करतात व आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात.    ह्या जुन महिन्यात सोमवार दि. २३ रोजी १७ वी मासिक सेवा केली जाणार आहे. शिवरात्रीच्या दिवशी श्री सिद्धेश्वर मंदिर, सिद्धेश्वर गल्ली येथे शिवरात्र किर्तन महोत्सव समितीच्या वतीने संध्याकाळी ५ ते ७ वां. हरिपाठ चे आयोजन केले असुन भक्तिनाद भजनी मंडळ, कल्यानीनगर,बारामती ह्यांच्यावतीने सेवा केली जाणार आहे. तसेच संध्या. ७ ते ९ वाजेपर्यंत सातारा येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार गुरुवर्य ह.भ.प. श्रीपाद महाराज जाधव हे कीर्तन सेवा करणार आहेत. किर्तनसेवा नंतर महाप...

वाहतुक पोलिसांची कडक कारवाई.! तीन दिवस पाठलाग ...'ती' चारचाकी पोलिसांच्या ताब्यात

इमेज
काळया काचा  सह साऊंड सिस्टम उतरविली, दंडात्मक कारवाईसह कोर्टात खटला दाखल; वाहतूक पोलिसांची कारवाई बारामती दि.३१ (महाराज्य टाईम्स)  तीन दिवसांपासून काळ्या काचा, नंबर प्लेटशिवाय आणि भरधाव वेगाने शहरात भरकटणाऱ्या एका संशयित चारचाकी वाहनाचा अखेर बारामती वाहतूक पोलिसांनी छडा लावला आहे. तीन दिवसांच्या पाठलागानंतर ही गाडी ताब्यात घेऊन संबंधित चालकावर कडक कारवाई करण्यात आली आहे.        २४ मे रोजी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे वाहतूक पोलीस जवान सुभाष काळे, प्रशांत चव्हाण, प्रदीप काळे, रूपाली जमदाडे आणि प्रज्योत चव्हाण यांच्यासह काळ्या काचा असलेल्या वाहनांवर कारवाई करत होते. याच वेळी भिगवण चौकातून काळया काचा असलेली आणि नंबर प्लेट नसलेली एक चारचाकी भरधाव वेगाने जाताना दिसली. पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता ती गाडी थांबली नाही आणि वेगाने निघून गेली. यानंतर ती गाडी सिटी इन चौकात थांबवण्यासाठी पोलीस निरीक्षक यांनी वाहतूक पोलीस स्वाती काजळे यांना कळविले. काजळे यांनीही सिटी इन चौकात गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, पण वाहनाने पुन्हा भरधाव वेग घेतला. पुढे...

मोहोळची तनुजा बारसकरची घोडदौड; " खेलो इंडिया युथ गेम्स साठी निवड"

इमेज
पोखरापूर दि.२४ (प्रभाकर बावधनकर) भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या" खेलो इंडिया "युथ गेम्स" स्पर्धेसाठी मोहोळ येथील क्रांतिवीर भगतसिंग स्पोर्ट्स अकँडमीची  विद्यार्थीनी कु. तनुजा  बारसकर हिची  निवड करण्यात आली आहे.           या स्पर्धा दि. ११ ते १३ मे २०२५ दरम्यान बोधगया, बिहार येथे  आयोजित केल्या आहेत. त्यासाठी तत्पूर्वी महाराष्ट्राच्या टीमसमवेत अधिकचा सराव बालेवाडी, पुणे येथे होणार आहे. तनुजा नितीन बारसकर ही सध्या दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असून, मोहोळ येथील क्रांतिवीर भगतसिंग स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये प्रशिक्षक दशरथ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेत आहे. तनुजाची मार्शल आर्ट्सबाबतची असलेली आवड, निष्ठा, जिद्द, चिकाटी, मेहनत यामुळे तिचा सराव उत्तम रीतीने घेण्यात आला आहे अशी माहिती  मार्शल आर्ट्स प्रशिक्षक दशरथ काळे यांनी दिली.  कोणत्याही परिस्थितीमध्ये मी जिंकणारच  असा ठाम निर्धार  बाळगून तिने सातत्याने कसून सराव करीत आहे. तिची तळमळ पाहून  प्रशिक्षक त्याच पद्धत...

सकल जैन समाज व व्यापारी संघटनांच्या वतीने उद्या बारामती बंद चे आयोजन !!

इमेज
महाराज्य टाईम्स: दि.२३ (बारामती) मुंबई मधील विलेपार्ले येथील 35 वर्षे जुने जैन मंदिर महानगरपालिकेने तडकाफडकी पाडून तेथील जिनमूर्ती आणि जैन शास्त्राची विटंबना व अवहेलना करून सकल जैन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ सकल जैन समाजाने गुरुवार, 24 एप्रिल रोजी भारत बंद पुकारला आहे.       या संदर्भात बारामती व्यापारी महासंघ व दि बारामती मर्चंट असोसिएशन यांना बारामती बंद करुन निषेध नोंदवण्यासाठी सर्व व्यापारी व दुकानदार यांनी सहकार्य करावे असे निवेदन सकल जैन समाजाने संघटनेला दिले होते. त्यानुसार व्यापारी संघटनेच्या झालेल्या मीटिंग मध्ये सर्वानुमते गुरुवार, 24 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 पर्यंत बारामती बंद ठेऊन या बंदला पाठिंबा दिला आहे.       तसेच गुरवारी 24 एप्रिल ला सकाळी 8.30 वाजता निषेध मोर्चा श्री मुनिसुव्रत दिगंबर जैन मंदिर, महावीर पथ येथून निघणार आहे.    तसेच सर्व शेतीमालाचे बाजार किंवा लिलाव सुद्धा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व शेतकर्यांनी सुद्धा याची दखल घ्यावी व या निषेध मोर्चाला सर्व धर्मियांनी सहभ...

प्राथमिक शिक्षका सौ. मंजुषा विभुते यांना तालुका व जिल्हा स्तरावर आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहिर !!

इमेज
महाराज्य टाईम्स (प्रभाकर बावधनकर): दि.१४   मोहोळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षका सौ. मंजुषा मोहन विभुते याची जिल्हा स्तर व तालुका स्तरावर आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार जाहिर झाला आहे.     मोहोळ तालुक्यातील सारोळे गाव येथील सोलापुर जिल्हा परिषद शाळेत अनेक वर्षांपासून प्राथमिक शाळा शिक्षिका पदावर कार्यरत असणार्या शिक्षिका सौ. मंजुषा मोहन विभुते यांच्या शैक्षणिक कार्यकाळातील उत्कृष्ट कामाचा, कर्तव्यदक्षतेचा व उपस्थितीचा तसेच त्यांच्या शिकवण्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा अहवाल बघितल्यानंतर शालेय प्रशासनाने शिक्षिका सौ.विभुते यांच्या नावाची शिफारस शासनाकडे तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर केली होती.     एकाच वेळेस जिल्हा व तालुका स्तरावर आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे मोहोळ तालुक्यात सौ.विभुते यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.  "मी अत्यंत प्रामाणिकपणे व कर्तव्यदक्षपणे शिक्षण ज्ञानदानाचे काम केले त्याची मला पावती मिळाली" अशी भावना आदर्श शिक्षिका म्हणून निवड झाल्यावर सौ.विभुते यांनी महाराज्य टा...

मंत्रा ग्रुपकडून लक्झरी सेगमेंटमध्ये ‘बर्गंडी’ची भव्य एंट्री; विक्रमी आर्थिक वर्षाची नोंद

इमेज
पुणे… १० एप्रिल २०२५… पुणेस्थित आघाडीच्या रिअल इस्टेट कंपनी मंत्रा ग्रुपने ‘बर्गंडी’ या नव्या लक्झरी ब्रँडच्या लॉन्चसह एक परिवर्तनात्मक वर्ष साजरं केलं आहे. शहरी उच्चवर्गाच्या बदलत्या अपेकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला हा ब्रँड, आधुनिक डिझाईन, निवडक सुविधांची रचना आणि उन्नत जीवनशैली यांचा उत्कृष्ट समन्वय साधतो. बर्गंडीअंतर्गत कंपनीने तीन भव्य प्रकल्प सादर केले असून, हे प्रकल्प वैभव, दर्जा आणि खासगीपणाचे प्रतीक ठरले आहेत. या यशस्वी वाटचालीत भर घालत, मंत्राने आर्थिक वर्षाचा समारोप तब्बल ₹१०२० कोटींच्या इन्व्हेंटरी विक्रीसह केला आहे — जो ग्राहकांचा विश्वास, बाजाराशी सुसंगत उत्पादन आणि ब्रँडच्या वाढत्या प्रभावाचं स्पष्ट प्रतिबिंब आहे. अनेक प्रकल्प अत्यंत अल्पावधीत पूर्णपणे विकले गेले, ज्यामुळे मंत्राने पुण्याच्या स्पर्धात्मक रिअल इस्टेट क्षेत्रात स्वतःचं स्थान अधिक भक्कम केलं आहे. झपाट्याने विस्तार होत असतानाही, वेळेवर बांधकाम पूर्ण करणे हे मंत्राचं खास वैशिष्ट्य ठरतं आहे. सर्व चालू प्रकल्प सुस्थितीत सुरु असून, अनेक प्रकल्प पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आहेत — जे ब्रँडच्या ...

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाईची मोहीम

इमेज
बारामती वाहतूक पोलिसांकडून ७० रिक्षांची तपासणी अन् ८ जणांवर दांडात्मक कारवाई बारामती, दि.०८ एप्रिल (महाराज्य टाईम्स)        बारामती शहरातील काही रिक्षाचालक प्रवाशांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याच्या तसेच गैरवर्तनाच्या तक्रारी मिळाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहरातील विविध प्रमुख चौकांत विशेष तपासणी मोहिम राबवण्यात आली.         या मोहिमेत मेडिकल कॉलेज, महिला हॉस्पिटल, सिटी इन चौक, श्रीराम नगर चौक, तीन हत्ती चौक, भिगवन चौक व बारामती बसस्थानक परिसरातील एकूण ७० रिक्षांची तपासणी करण्यात आली. वाहन चालवण्याचा परवाना, विमा (इन्शुरन्स), वाहनाची फिटनेस स्थिती, चालकांचे गणवेश आणि इतर नियमांचे पालन होत आहे की नाही? याची बारकाईने पाहणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान ८ रिक्षाचालकांवर कारवाया करून एकूण ७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. विशेष म्हणजे, एका रिक्षाचालकाला गुटखा खाऊन वाहन चालवत असल्याबद्दल २०० रुपयांचा दंड करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रश...

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

इमेज
बारामती : बारामतीत शहरात सकाळी सकाळी एक धक्कादायक घटना घडली असून या घटनेत मॉर्निंग वॉक' ला निघालेल्या वयोवृद्धाला बारामती मधील एका खाजगी कंपनीच्या बसने चिरडले असून वायोवृद्धाचा जागीच मृत्यु झाला आहे.      या अपघातात बारामतीतील जेष्ठ मुद्रक व्यवसायिक मोतिलाल उत्तमचंद दोशी ( वय 82 वर्षे ) यांचा मृत्यु झाला असून दोशी हे पहाटे बारामती मधील नगरपालिकेसमोरून भिगवणरोड दिशेने मॉर्निंग वॉक' ला निघाले असताना मागुन आलेल्या एका खाजगी कंपनीच्या बसने बस क्र. MH01 L7309 ने त्यांना चिरडले त्यांच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. या प्रकरणी बस चालक सुनील पांडुरंग शेंडगे वय- ३९ रा. खंडोबानगर,बारामती मुळ रा. भिगवण ता.इंदापूर  यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      प्रत्यक्ष ज्यावेळी घटना घडली तेव्हा बस चालक याने जागेवर बस न थांबविता एवढा मोठा अपघात होवून देखील अपघातात गंभीर व्यक्तीला उपचारासाठी मदत न करता चालक बससह पळून गेला त्यामुळे नागरिकांकडून झालेल्या घटनेचा प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.     ...