पुणे येथील बालगंधर्व रंगमंच ५८ वा वर्धापन दिनी बारामतीच्या गायकांचा सन्मान !!
बारामती: (महाराज्य टाईम्स): बालगंधर्व रंगमंदिराच्या ५८ व्या वर्धापनदिनी बारामती व परिसरातील संगीत व गायन क्षेत्रातील नावाजलेल्या कलाकारांचा रिस्टार्ट एन्टरटेन्मेंट ग्रुप प्रस्तुत बहारदार कॅराओके गीतांच्या कार्यक्रम सादर करण्याची संधी आयोजकांनी देऊन ग्रुपचा मोठा सन्मान केला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या बालगंधर्व परिवार ट्रस्ट आयोजित, अलविरा मोशन एंटरटेन्मेंट प्रस्तुत, बालगंधर्व रंगमंदिराचा ५८ वा वर्धापन दिन महोत्सव २४, २५ व २६ जून २०२६ रोजी गेल्या १९ वर्षापासून सातत्याने आणि दिमाखात साजरा करण्यात येत असतो अशा प्रसंगी बारामतीच्या कलाकारांना आपली कला सादर करण्याची अमूल्य अशी संधी मिळाली होती. जुन्या गाण्यांच्या तालावर प्रेक्षकांचा टाळ्यांचा कडकडाट: रिस्टार्ट एन्टरटेन्मेंट ग्रुपने हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील एकापेक्षा एक सरस, दर्जेदार आणि लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सुरेल गायन, उत्कृष्ट सादरीकरण आणि कलाकारांमधील समन्वयामुळे संपूर्ण कार्यक्रम रंगतदार झाला. प्रत्येक गाण्यानंतर ...