पोस्ट्स

मनुष्याने मानवी गुणांनी युक्त होऊन जीवन जगावे...!! निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज

इमेज
*बारामती येथे हर्शोल्हासात पार पडला एक दिवसीय निरंकारी संत समागम*     (संत समागम साठी प्रचंड संख्येने उपस्थित भक्त परिवार) बारामती (महाराज्य टाईम्स) - “मनुष्य जीवन अनमोल आहे. त्याचा मुख्य उद्देश लक्षात घेऊन ब्रह्मज्ञानाद्वारे ईश्वराची ओळख करून भक्ती करावी आणि मानवीय गुणांनी युक्त होऊन सुंदर जीवन जगावे. असे उदगार सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी काढले.     सदरचा निरंकारी संत समागम बारामती येथील टी सी कॉलेजच्या भव्य मैदानावर मंगळवारी (ता. 6) आयोजित केला होता. त्याप्रसंगी त्यांनी वरील उदगार काढले.       या समागमास बारामती परिसरासह, पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर नाशिक, संभाजीनगर, उस्मानाबाद आदी भागातून पन्नास हजाराहून अधिक श्रद्धाळू भाविक सज्जनांनी सद्गुरू माताजींच्या दिव्य दर्शनाचा आणि प्रवचनाचा लाभ घेऊन सत्संगचा मनमुराद आनंद लुटला.      भक्तीचे सार समजवताना सद्गुरु माताजी पुढे म्हणाल्या की, आपण सर्वांनी प्रेम आणि भक्तीपूर्ण जीवन जगले पाहिजे. आपल्याला मिळालेल्या या मनुष्य जीवनाचे सदैव सुंदर कर्म...

शरद पवारांच्या सत्तेला निवडणूक आयोगाकडून जोरदार धक्का !! अजित पवारांना मिळाला राष्ट्रवादीचा शिक्का !!

इमेज
बारामती: (महाराज्य टाईम्स) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्यातील लढतीबाबत निवडणूक आयोगाने मंगळवारी आपला निर्णय जाहीर केला, ज्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.  सहा महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या सुनावणीत निवडणूक आयोगाने (NCP) मध्ये सुरू असलेल्या वादावर तोडगा काढला.  निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने निकाल देत अजित पवार गटालाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असे संबोधले. पवारांच्या सत्तेला निवडणूक आयोगाकडून झटका,  पुतण्या अजित पवारांना राष्ट्रवादीचा शिक्का ठळक मुद्दे- निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निकाल दिला. निवडणूक आयोगाने अजित पवार यांना नाव आणि चिन्ह दिले.  शरद पवार यांना निवडणूक आयोगाकडून तीन दिवसांचा अवधी मिळाला. पक्षावर दावा सांगण्याच्या लढाईत शरद पवारांना मोठा झटका बसला आहे.  प्रदीर्घ सुनावणीनंतर निवडणूक आयोगाने पुतणे अजित पवार यांच्या गटाला खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) घोषित केले आहे.  याशिवाय पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह दोन्हीही त्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने शरद पवारांना वेळ दिला यासोबतच शरद पवा...

मंत्री महोदय येता दारा....चकाचक रस्ता रात्रीत होतो भरा भरा ?? -- जनतेच्या पैशाचा पुरेपुर वापर ? ?

इमेज
बारामती: (महाराज्य टाईम्स) बारामती शहरात रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. प्रचंड खड्डे चुकवत दुचाकी चालकांचे खुप हाल होत आहेत. पण प्रशासन मात्र डोळेझाक करताना दिसतयं का असा प्रश्न आहे. मात्र मंत्री महोदय शहरात येणार म्हटले की एका रात्रीत रस्ता करण्यात येतो असे दिसून आले आहे.      काही दिवसांपूर्वी शहरातील प्रतिष्ठित जेष्ठ व्यापारी व एका संस्थेचे अध्यक्ष यांचे निधन झाले त्यांच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट देण्यासाठी तांदुळवाडीवेस चौक येथे राज्याचे उपमुख्यमंत्रि व बारामतीचे विकास पुरुष मा. अजितदादा पवार येणार होते.     आदल्याच दिवशी रात्रीत शासकिय यंत्रणा युद्ध पातळीवर कामाला लागली. जुनी मंडई गुनवडी चौक ते तांदूळवाडीवेस चौक असा रस्ता अगोदर चांगलाच होता म्हणजे खड्डेखुड्डे असा काही वाईट अवस्था नव्हती. खरी वाईट अवस्था होती ती तांदूळवाडी वेस चौकाच्या पुढे श्री हनुमान मंदिर जवळ विलास खैरे यांच्या गॅरेजच्या दारात प्रचंड मोठा खड्डा अनेक महिन्यांपासून होता. अनेक दुचाकी चालक या खड्ड्यात पडल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले आहे. पावसाळ्यात तर पाण्याचे डबकं तयार होऊन गॅर...

डिजिटल मार्केटिंग व जाहिरात हा प्रत्येक व्यवसायाचा मेंदू तोच आजकाल व्यवसायाला गती देऊ शकतो - किरण पवार

इमेज
प्रतिनिधी -(महाराज्य टाईम्स) बारामती बिजनेस चौक या माध्यमातून बारामती मधील व्यवसायिकांसाठी एक व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे. बारामती परिसरातील छोट्या मोठ्या व्यवसायिकांपासून सर्वच क्षेत्रातील लोकांचा यामध्ये समावेश आहे.      "बीबीसी" च्या माध्यमातून वेगवेगळी चर्चासत्रे आयोजित केली जातात. या नविन संकल्पनेने अनेक अनोळखी जुने नवे व्यावसायिक एकमेकांशी जोडले गेले आहेत. काही जण १०-२० वर्षापासून व्यवसाय करत आहेत तर काही जण नुकतेच व्यवसायात पडले आहेत. जरी एखादा व्यवसायिक अनेक वर्षापासून व्यवसाय करत असेल तरी आजकालच्या स्पर्धेच्या युगात एखादी ट्रिक व्यवसायाला गती देऊ शकते.      यासाठी आजच्या संवाद दोन या सत्रात व्यवसाय वाढीसाठी जाहिरात व डिजिटल मार्केटिंग याविषयी फ्युजन ग्रुपचे संचालक किरण पवार यांनी आज उपस्थित व्यवसायिकांना मार्गदर्शन केले.  हा कार्यक्रम अमित देशपांडे यांच्या सेवन हेवन केक शॉप येथे सुभद्रा मॉल सिटी इन चौक येथे संपन्न झाला.        प्रत्येक व्यवसाइकाने डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून करावयाच्या गोष्टी ...

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

इमेज
बारामती: (महाराज्य टाईम्स) बारामती शहरातील खंडोबानगर येथिल गॅरेजमधून तिन वेळा चोरी झाली. गॅरेज मालकाने शेवटी स्वत:च चोराला दबा धरुन पकडले. ३ लाख रुपयांचा माल चोरीला जाऊनही बारामती शहर पोलिसांनी केवळ ३० हजार रुपयांच्या चोरीची फिर्याद दाखल करून घेतल्यामुळे याबाबत तक्रारदाराने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जनता दरबारात धाव घेतली. पण पोलिसांविषयी तक्रार आहे कळाल्यावर जागृत नागरिकाला पोलिसांनी रांगेतुन बाहेर काढल्याचा प्रकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच घडला. बारामती शहरातील खंडोबानगर येथे सागर तानाजी देवकर यांच्या मालकीचे श्रेयश ऑटो हे चारचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे. ८ जानेवारी रोजी या गॅरेजमधून ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. त्यावेळी सागर देवकर यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या दरम्यान, पोलिसांनी गॅरेजवर जाऊन घटनेची माहिती घेत आम्ही लवकरच चोराला पकडू असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर पुन्हा दि. १४ जानेवारी रोजी चोरीचा प्रकार घडला. त्यावेळीही सागर देवकर यांनी तक्रार दिली. मात्र पोलिसांनी त्याची कसलीही दखल घेतली नाही. त्यानंतर दि. १९ जानेव...

श्री दत्त जयंती निमित्त श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक (दिंडोरी प्रणित) केंद्रात भव्य स्वरूपात श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह संपन्न !!

इमेज
बारामती: (महाराज्य टाईम्स) बारामती शहरात नाना-नानी पार्क, भिगवण रोड येथे श्रीदत्त जयंती निमित्ताने सात दिवस रोज धार्मिक याग, अखंड नामस्मरण व श्री गुरु चरित्राचे अखंड पारायण दि २७ रोजी महाआरती करून संपन्न झाले.      बारामती शहरात अनेक वर्षापासून भिगवण रोडला शिवाजीनगर, जळोची येथे नाना-नानी पार्क मध्ये श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र (दिंडोरी) प्रणीत प्रसिध्द आहे. तिथे श्री स्वामी समर्थांची नित्योपसना, आरती, नामस्मरण असे दैनंदिन कार्यक्रम चालतात. हजारो सेवेकरी बारामती परिसरातील नित्य उपस्थिती राहून सेवा करतात. दरवर्षी श्री स्वामी समर्थ जयंती, पुण्यतिथी व श्री दत्त जयंती असे प्रमुख कार्यक्रम केले जातात.      यावर्षी श्री दत्त जयंती निमित्त १९/१२/२०२३ ते २७/१२/२०२३ पर्यंत श्री गुरु चरित्र पारायण सप्ताह आयोजित करण्यात आला होता. खुप भव्य पवित्र व धार्मिक अशा वातावरणामध्ये ३१४ सेवेकर्यांनी पारायणामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सेवा अर्पण केली. पारायणाच्या बरोबरच दररोज श्री गणेश याग, मनोबोध याग, गीताई याग, श्री स्वामी याग, श्रीचंडी याग, श...

सामाजिक समतेच्या महानायकाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त बारामतीत अभिवादन !!

इमेज
बारामती(महाराज्य टाईम्स) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,सामाजिक समतेचे महानायक,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज बारामतीत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीने या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी मनोगत व्यक्त करत असताना विविध मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीकारी कार्याला उजाळा दिला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समुदायीक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.या अभिवादन कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी,गणेश इंगळे पोलीस निरीक्षक,दिनेश तायडे,मुख्याधिकारी महेश रोकडे,तहसीलदार गणेश शिंदे,तलाठी चेतन पोळ,उपप्रादेशिक वाहन अधिकारी,राजेंद्र केसकर बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील,अविनाश बांदल,बिरजू मांढरे,ॲड.विनोद जावळे,माजी नगरसेवक विजय सोनवणे,किसन सोनवणे,राजेंद्र सोनवणे,...

पाऊसामुळे एसटी स्टँडवर चिखल घाणीचा प्रचंड राडा !! बारामतीच्या नेते, डेपो मॅनेजरनी लोकांचा त्रास बघायला वेळ तरी काढा ? प्रवाशांचा प्रचंड रोष

इमेज
  बारामतीः दि. ०१ डिसेंबर २०२३  बारामती शहरात कसबा येथे तात्पुरते केलेले एसटी बसस्थानकात प्रवाशांना प्रचंड मनस्ताप आणि त्रास सोसावा लागत असल्याचे दिसुन आले आहे. स्वच्छ सुंदर बारामतीत प्रवाशांचे हाल होत आहेत. " प्रवाशांच्या सेवेसाठी" ब्रीदवाक्य ठरले खोटे?  बारामतीचे विकास पुरुष उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी रविवारी थोडा वेळ काढा !! तिकिटाचे पूर्ण पैसे भरून होणारा लोकांचा त्रास बघायला एकदा तरी या ?? -- सर्व प्रवाशांचा प्रचंड रोष !!   बारामतीत विमानतळासारखे प्रचंड  भव्य व सुंदर असे एसटी बसस्थानक नागरीकांच्या कष्टाच्या पैशातुन करोडो रूपये खर्च करून करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू झाल्यापासुन पर्यायी जागा म्हणून कसबा येथे कै.गुलाबराव ढवाण पाटील चौकात सुरू करण्यात आले होते. नवीन बस स्थानकाचे काम अनेक महिन्यांपासुन सुरू असुन कधी पुर्ण होईल याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे. कारण तात्पुरत्या स्वरूपात सुरू केलेल्या कसबा येथील बसस्थानकामुळे बारामती शहरातील लोकांना कसबा येथे सोय झाली खरी पण जाण्या येण्याचा त्रास तर आहेच पण इतर गोष्टींमुळें सुध्दा नागरीकांमध्ये प्रचंड ना...

मावळा जवान संघटना संचलित शिव दुर्ग संवर्धन समिती, स्वराज्य प्रतिष्ठान इतिहासाचे जतन आणि गडकिल्ले संवर्धन, महाराष्ट्र भव्य गड-किल्ले बांधणी स्पर्धा 2023 चे आयोजन

इमेज
बारामती (महाराज्य टाईम्स):  मावळा जवान संघटना संचलित शिव दुर्ग संवर्धन समिती,स्वराज्य प्रतिष्ठान इतिहासाचे जतन आणि गडकिल्ले संवर्धन, महाराष्ट्र भव्य गड-किल्ले बांधणी स्पर्धा 2023 चे आयोजन वर्ष ६ वे  या मोहिमेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होऊन शूरवीर मावळ्यांचा इतिहास पुढील येणार्‍या पिढीने जपावा,म्हणून सदर गड-किल्ले बांधणी मोहिम मध्ये सहभागी आणि योगदान देणाऱ्या आताच्या पिढीतील मावळ्यांचे कार्याबद्दल बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील महेश काटे आणि धणे वस्ती येथील उपक्रमातील सर्वानी उत्कृष्ट असा जंजिरा किल्ला बनविला तसेच हनुमान नगर माळेगाव येथील संकेत प्रकाश सातव,सातव वस्ती जय शेंडगे, अविष्कार जाधव, श्रेयस जाधव,तेजस जराड, त्यांचा सन्मान श्री प्रदीप ढुके संस्थापक,अध्यक्ष स्वराज प्रतिष्ठान, अध्यक्ष मावळा जवान संघटना बारामती,शिवदुर्ग संवर्धन समिती,दत्ता हरिहर,रमेश मरळ(देशमुख),अर्चनाताई सातव शहर अध्यक्षा अखिल भारतीय मराठा महासंघ बारामती,शिवाजी घाडगे,प्रकाश सातव हे उपस्थितीत होते. मुलांनी गड किल्ले बांधले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आ...

धनगर आरक्षण आंदोलनाला जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांची उपोषण मागे घेण्यासाठी भेट, उपोषणकर्ते मागणीवर ठाम. उद्या दू. 12 पर्यंत बारामती बंद राहणार

इमेज
उद्या बारामती बंद दुपारी १२ वाजेपर्यंत राहणार असून व्यापारी महासंघ व आंदोलनकर्ते यांचे आवाहन बारामती:- (महाराज्य टाईम्स) बारामतीत गेली सात दिवसापासून धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या चंद्रकांत वाघमोडे यांना पाठिंबा देण्यासाठी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होत असून गावातून रॅली काढून पाठिंबा देण्यात आला प्रशासन भवन, बारामती समोर चालू असलेल्या उपोषणाला धनगर आरक्षणासाठी प्रशासकीय भवन बारामती येथे सुरु असलेल्या आमरण उपोषणाला महिलांचा भाऊबीज करुन पाठिंबा देण्यात आला, उपोषण कर्त्याची दखल तात्काळ न घेतल्यास उद्या दि. 16/11/2023 ला बारामती बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता यावेळी पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख व पोलीस अधीक्षक अंकित गोयल पुणे ग्रामीण यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांच्याशी चर्चा करून आम्ही शासनाच्या वतीने आलो आहोत आपण उपोषण सोडावे अशी विनंती करण्यात आली.     यावेळी बऱ्याच वेळ समजाविण्याचा प्रयत्न केला परंतु उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे हे आपल्या भूमिकेवर ठाम होते, त्यांनी हात जोडून जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक...

मोहोळ येथील राजगुरु अबॅकस अकॅडमीचे घवघवीत यश...!!

इमेज
  *"मोहोळच्या शैक्षणिक क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा..."* महाराज्य टाईम्स:(प्रभाकर बावधनकर)  मेट्रोब्रेन एज्युकेअर प्रा. लि. आयोजित * 7 वी राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेमध्ये राजगुरु मेट्रो ब्रेन अबॅकस अकॅडमीने महाराष्ट्रांत मिळविले दैदिप्यमान यश.* सदर स्पर्धेमध्ये एकूण 400 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यातील *राजगुरु अबॅकस अकॅडमीच्या 46 विद्यार्थी* सहभागी झाले होते. त्यापैकी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणारे *State Level Topper of the Topper अवॉर्ड 32 व Achievers Award 28* मिळविले.      यातील *विघ्नेश औदुंबर वाघमोडे याने ZR लेव्हलमध्ये द्वितीय व ZR 2मध्ये प्रथम क्रमांक हा अवॉर्ड मिळविला.* उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील सर्व अकॅडमी पैकी *सर्वात जास्त अवार्डस् मिळविणारी एकमेव अकॅडमी* म्हणून *राजगुरु अबॅकस अकॅडमीला* बहुमान मिळाला.       याबद्दल अकॅडमीचे राज्यभरातील विविध क्षेत्रातून कौतुके होत आहे. या यशाबद्दल *मेट्रोब्रेनचे डायरेक्टर श्री. संतोषजी लोहारे सर* यांनी *राजगुरु अबॅकस अकॅडमीच्या संचालिका सौ. निलम स्वप्निल रा...

मा. पालकमंत्री अजित पवार, प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात आझाद मैदान, मुंबई येथे जागा मालकांचे आज उपोषण

इमेज
बारामती: दि. २६ (महाराज्य टाईम्स) बारामती मेडद येथे म्हाडा प्राधिकरणाकडून खरेदीखत करून घेतलेल्या मालकीच्या जमिनी परस्पर अजित पवार यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दबाव टाकून आमच्या जमिनीच्या नोंदी रद्द करून प्रकरण हायकोर्ट मुंबई येथे न्याय प्रविष्ट असताना आयुर्वेदिक कॉलेज चे नाव लावून बांधकाम चालू केले आहे. त्या निर्णयाविरोधात मुंबई येथे प्लॉट धारक उपोषण ला गुरुवार 26 ऑक्टोबर रोजी बसणार आहेत.        मौजे मेडद ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. ४९४/२ ही जागा म्हाडा प्राधीकरण, पुणे यांच्या नावावर होती त्यानंतर सदर जागा सह जिल्हा निबंधक वर्ग-१ व जिल्हाधीकारी मुद्रांक पुणे ग्रामीण यांच्या कडे कायदेशीर नोंदणी शुल्क भरून मानीव खरेदीखताने जवळपास २०६ व्यक्तींनी खरेदीखत करून विकत घेतली आहे. प्लॉट धारकांच्या नावावर म्हाडा प्राधीकरणाने सदर जागेची ताबा पावती नकाशासह सक्षम अधिकारी यांच्या सही शिक्क्यानीशी दिली आहे. सदर जागा अजुनही प्लॉट मालकांच्या कब्जे वहिवाटीत आहे. अजुन त्यांनी कुणालाही खरेदीखत करून अगर कायदेशीर विक्री करून ताबा दिला नाही. किंवा म्हाडा प्राधिकरणाने सुध्दा त...

मोहोळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी !! सव्वा सहा कोटीचे मफेड्रोन ड्रग्स पकडले. २ जण ताब्यात

इमेज
मोहोळ,: (प्रभाकर बावधनकर) सोलापुर ग्रामीण पोलीस दलाच्या कारवाईत आज पुणे सोलापूर महामार्गावर दोन जणांकडून सहा कोटी दोन लाख रुपयांचे मेफेड्रॉन व त्यापासून ड्रग्स तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल दहा लाख 9 हजार रुपये असा 6 कोटी 12 लाख रुपयांचा अमली पदार्थांचा साठा पोलिसांनी जप्त केला. मोहोळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रदीप झालटे यांना 17 ऑक्टोबर रोजी त्यांच्या कार्यालयात खबऱ्यांकडून अशी माहिती मिळाली की, सोलापुर ते पुणे हायवे रस्त्यावर देवडी गावच्या फाट्यावर एका हॉटेलजवळ (ता. मोहोळ, जिल्हा. सोलापुर) येथे काहीजण मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विकी करण्याकरीता येणार आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर श्री झालटे यांनी मोहोळचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना याची माहिती दिली त्यानंतर घुगे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव व पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे यांना या संदर्भातील माहिती दिली त्यांच्या सूचनावरून सापळा रचला. पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यातील साधे वेशातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके तयार करून, मागण्यांचे गटविकास अधिकारी मह...

बारामती मध्ये प्रथमच, श्री कुलदेवी सह साडेतीन शक्तीपीठांचा मूर्तीरूप दर्शन महोत्सव

इमेज
. (बारामती : महाराज्य टाईम्स) श्री तुळजाभवानी माता, करवीरनिवासीनी श्री अंबाबाई, वणीची श्री सप्तश्रृंगी माता, माहूरची श्री रेणुका माता तसेच राजस्थान आणि गुजरात मधील जैन, माहेश्वरी, सकल राजस्थानी समाजाच्या जवळपास 48 कुलदेवींची हुबेहूब मूर्ती ही नवरात्रीच्या पावन दिवसात प्रथमच आपल्या बारामती नगरीमध्ये दर्शन, पूजा-अर्चना साठी श्री कुलदेवी दर्शन महोत्सव समितीच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. शहरातील श्री महावीर भवन येथे शनिवारी, 21 ऑक्टोबर ला दुपारी 3 वाजल्यापासून तसेच 22 आणि 23 ऑक्टोबरला सकाळी 8 ते संध्याकाळी 9 पर्यंत दर्शन सेवा उपलब्ध राहणार आहे. या महोत्सवामध्ये सर्व कुलदेवींची रोज आरती, भजन चे नियोजन करण्यात आले आहे. तसेच सर्व कुलदेवींची थोडक्यात माहिती, आख्यायिका यांचे सुद्धा माहितीपत्रक हे लावले जाणार आहेत... या पुण्यदायी, अलौकिक, सामाजिक तथा धार्मिक महोत्सवाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घेण्याचे आव्हान श्री कुलदेवी दर्शन महोत्सव समितीचे सदस्य स्वप्निल मुथा, गुणेश भेडा, सीए सम्राट सोमाणी, मंदार सिकची, सचिन बोरा, सुयोग मुथा, गौरव कोठाडिया, सचिन मुथा यांनी केले आहे. ...

जुनी मंडई गाळ्यांवर पडला हातोड्याचा घाव !! गाळेधारकांनीं घेतली अजितदादांकडे धाव !!

इमेज
बारामती: (महाराज्य टाईम्स) बारामती शहरातील गुणवडी चौक जवळील जुनी भाजी मंडई मध्ये अनेक वर्ष भाजी मंडई भरत होती. गणेश मार्केट नवीन झाल्यावर सर्व भाजी विक्री तिकडे चालू झाली. जुन्या जागेत बारामती नगर परिषदेचे जवळपास २०० गाळेधारक व्यावसायिक अनेक वर्षापासून व्यवसाय करत आहेत. परंतु आता विकासाचे वारे शहरात जोरात वाहत असून त्यामुळे जुनी मंडई पाडून त्याजागी कमर्शिअल कॉम्प्लेक्स बांधायचे निश्चित झाले आहे.        परंतु जुन्या गाळेधारकांना कुठेही विश्वासात न घेता किंवा त्यांना जमेत न धरता त्यांना पर्यायी योग्य जागा कुठे देणार हे निश्चित न करता गाळ्यावर हातोडा मारून प्रशासनाने ऐन सणाच्या काळात कारवाई ची दहशत निर्माण केल्याचे परवा दिसून आले. ह्या अचानक केलेल्या कारवाई मूळे गाळेधारकांमध्ये प्रचंड चीड व आक्रोश निर्माण झाला आहे. नगर परिषदकडून कंत्रादार उत्तम धोत्रे याकडून तोडफोड करण्यात आली. त्यावेळेस प्रचंड तणाव व वाद निर्माण झाला होता. वरून पडण्याचा आदेश असल्यामुळे कंत्राटदार ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. परंतु लोकांच्या रोषामुळे काम थांबवण्यात आले.      ...